Virar Crime News : बिहारमधील घटना ; 16 वर्षा पुर्वी जुन्या भांडणाचा मनात राग धरुन, दुहेरी हत्याकांड
नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश ; बिहार राज्यातून निर्घण खून करुन पळून आलेल्या आरोपी यास ताब्यात
विरार :- बिहार राज्य जिल्हा नवादा मधील रोहा पोलीस ठाणे हद्दीतील बारापाण्डेया या गावातील फिर्यादी नावे सरितादेवी सुनिल रंजक हया त्यांचे पती हरवील्याची तक्रार देणे करीता पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्याचवेळी बारापाण्डेया गावाच्या हद्दीत एक 6 तुकडयांत कापलेले मृत पुरुषाचे शव मिळून आले होते. सदरचे शव फिर्यादी सरितादेवी रंजक यांना दाखविले असता सदरचे शव त्यांच्या पतीचेच असल्याचे फिर्यादी सरितादेवी रंजक यांनी ओळखले, त्यावरुन फिर्यादी सरितादेवी रंजक यांनी अज्ञात इसमा विरुध्द तक्रार दिल्याने रोह पोलीस ठाणे (बिहार) भादविस कलम 302,201,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासादरम्यान नमुद गुन्हयातील संशयीत आरोपी चिंचोटी परिसरात आला असल्याची माहिती बिहार पोलीसांनी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ 2 मिरा भाईंदर वसई विरार यांना कळवीली. माहिती पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-2 यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नायगांव पोलीस ठाणे यांना देऊन संशयीत आरोपीचा शोध घेण्याचा आदेश दिला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनखाली नायगांव गुन्हे प्रकटीकरण पथकाचे दोन वेगवेगळे पथके बनवून सदर आरोपीत यांचा कसुन शोध घेतला असता, संशयीत आरोपी नामे सुजित उर्फ सुरज उमेश सिंग (31 वर्षे) राहणार- पाटील पाडा, चिंचोटी, कामन ता. वसई जि. पालघर मुळ राह. गांव बडकी खडां, पोलीस स्टेशन सहर, जि भोजपुर राज्य बिहार हा मिळून आला. सदर आरोपीत याच्याकडे नमुद गुन्हयाच्या अनुशगाने कौशल्यपूर्ण चौकशी केली असता सदर आरोपीत यांने वरील गुन्हा त्याचा साथिदार नामे रंजनीश शर्मा राह. रोह, जि. नवादा राज्य बिहार याच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली. तसेच सदरचा गुन्हा त्याने सरितादेवी सुनिल रंजक (मयताची पत्नी/तक्रारदार) हिच्या सांगण्यावरुन केला असल्याचे सांगीतल्याने बिहार पोलीसांना गुन्हयातील आरोपी नामे रंजनीश शर्मा व सरितादेवी सुनिल रंजक हिस ताव्यात घेण्याबाबत कळविले.
आरोपीकडे अजुन काही अशाच प्रकाराचे गुन्हे केले अगर कसे याबाबत अधिक कसुन व कौशल्यपुर्ण चौकशी केली असता सदर आरोपी याने 16 वर्षा पुर्वी जुन्या भांडणाचा मनात राग धरुन मीजे बरडकी खारांकला, सहर पोलीस ठाणे राज्य बिहार या गावचा मुखीया नामे राजकुमार कानु व त्याचा मित्र नामे यादव यांचा दुहेरी खुन केला असल्याची कबुली दिली. पोलीस ठाण्यास कळविण्यात आले असुन सदर आरोपीस पुढील योग्य त्या कायदेशीर कार्यवाही करीता रोह पोलीस स्टेशन, जि. नवादा, राज्य बिहार यांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस पथक
पौणिमा चौगुले पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 2 वसई, पदमजा बडे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर टिळेकर, पोलीस निरीक्षक (प्रशा.) मंगेश अंधारे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे, पोलीस अंमलदार सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, संजय बनसोडे,सिध्देश्वर क्षीरसागर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.