मुंबई

Virar Crime News : ‘मी पोलीस आहे!’ म्हणत धमकावणारा तोतया गजाआड! विरार पोलिसांकडून ‘ब्लॅकमेल’ करणाऱ्या आरोपीला नालासोपारातून अटक

•अश्लील वर्तनाची धमकी देत नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार; फसवणुकीचे तीन गुन्हे उघडकीस

विरार :- रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांना पोलिसाची बतावणी करून धमकावणे आणि अश्लील वर्तनाची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळणे अशा गंभीर फसवणुकीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या एका आरोपीला विरार पोलिसांनी जेरबंद केले आहे. विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कौशल्यपूर्ण कामगिरी करत आरोपीला नालासोपारा परिसरातून अटक केली आहे.

विरार पूर्व येथील फुलपाडा आर. जे. नाका परिसरात 12 सप्टेंबर 2025 रोजी ही घटना घडली होती. तक्रारदार ललित शिवलाल माळी हे त्यांच्या मैत्रिणीसोबत रस्त्याने पायी जात असताना, अंदाजे 30 ते 35 वयोगटातील एका अनोळखी इसमाने त्यांना अडवले. त्याने स्वतःला पोलीस भासवत, “सोबत कोण आहे, अश्लील वर्तन का केले? मी रेकॉर्डिंग केलेली आहे,” अशी धमकी दिली. फिर्यादी घाबरल्याने आरोपीने त्यांच्याकडून पैसे घेऊन फसवणूक केली. या तक्रारीवरून 16 सप्टेंबर 2025 रोजी विरार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता-2023 च्या कलम 318(4), 204 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता.

शोध घेऊन आरोपीला अटक

या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत, वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांनी तातडीने तपास सुरू केला. बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून, पोलिसांनी या अनोळखी आरोपीचा शोध घेतला. तपासात ज्ञानेश्वर पाटील नावाच्या इसमाने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याला मोरेगाव, नालासोपारा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी फसवणूक केलेली रक्कमही हस्तगत केली आहे.या आरोपीच्या अटकेमुळे विरार पोलीस ठाण्यातील फसवणुकीचे एकूण तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

आवाहन

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे कोणी ‘पोलिसाचे सोंग’ घेऊन फसवणूक केली असल्यास, त्यांनी तात्काळ विरार पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुहास बावचे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ-3) आणि बजरंग देसाई (सहायक पोलीस आयुक्त, विरार) यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल. एम. तुरे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने पार पाडली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago