क्राईम न्यूज
Trending

Virar Crime News : गावठी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त; विरारमधील घटना, 1.11 लाखांचा माल जप्त

Virar Police Busted Gavathi Daru Adda : 3 हजार लिटर नवसागर गुळ मिश्रीत,60 लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि साहित्य जप्त, गुन्हे शाखा कक्ष-3 विरार यांची कारवाई

विरार :- विरार पोलिस ठाण्याच्या Virar Police Station हद्दीतील गावठी हातट्टीच्या Gavathi Daru Adda अड्डयांवर छापे टाकत गुन्हे शाखा कक्ष-3 विरार यांनी 1.11 लाख रुपये किंमतीचे तीन हजार लिटर कच्चे रसायन जप्त केले. तसेच महिलेच्या विरोधात विरार पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(फ),(ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Virar Police Latest Crime News

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई करत अवैधरीत्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणारा अड्डा उध्वस्त केल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखा कक्ष-3 च्या पथकाला माहिती मिळाली की, विरार पुर्व बरफ पाडा खिंड लगतच्या जंगलातील डोंगर परिसरात बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टी दारु तयार होत आहे. गोपनीय बातमीवरुन विरार पूर्व बरफ पाडा खिंड हद्दीतील जंगलातील डोंगर परिसरात छापा घालुन करण्यात आलेल्या कारवाई मध्ये 1.11 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला जप्त करण्यात आला आहे.3 हजार लिटर नवसागर गुळ मिश्रीत,60 लिटर गावठी हातभट्टीची दारु व गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याची साधने मिळून आले असुन महिला आरोपी विरुध्द पोलीस हवालदार सागर सखाराम बारवकर, गुन्हे शाखा कक्ष-3 विरार यांनी सरकारतर्फे विरार पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असुन याबाबत विरार पोलीस ठाणे येथे महिलेच्या विरोधात गुन्हा करण्यात आला आहे. Virar Police Latest Crime News

पोलीस पथक

मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त , दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त सो (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, तुषार दळवी, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 विरार यांनी पार पाडली आहे. Virar Police Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0