Virar Crime News : चोरी करणाऱ्या सराईत चार आरोपींना अटक ; 9 गुन्ह्यांची उकल
•वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी कॅमेरा, लॅपटॉप, मोबाईल, घरफोडी करणाऱ्या 4 सराईत आरोपींना अटक केले आहे.
विरार :- वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी कॅमेरा, घरफोडी, लॅपटॉप, मोबाईल चोरी करणाऱ्या 4 सराईत आरोपींना अटक केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून 9 गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या 40 मोबाईल फोन,3 लॅपटॉप, 1 कॅमेरा, 8 मनगटी घड्याळ असा एकूण 4 लाख 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती वालीव पोलिसांनी दिली आहे.
15 ऑगस्ट च्या दरम्यान फिर्यादी संदीप सुदाम व्यवहारे यांच्या नम्रता फोटो स्टुडिओ (साईनगर गौराई पाडा वसई पूर्व) येथून लॅपटॉप कॅमेरा आणि कागदपत्र असा एकूण 14 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार वालीव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात 305(ए), भारतीय न्याय सविता 2023 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 यांच्या कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते आहे. वरिष्ठ पोलिसांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी घडलेल्या घटनेच्या ठिकाणापासून सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे शोध मोहीम राबवून चार आरोपींना सापळा रचून वसई पूर्व येथून ताब्यात घेतले आहे. वालीव पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींची कौशल्याने तपास केला असता त्यांनी वालीव, आचोळे, तुंळीज,पेल्हार पोलीस ठाण्यातील चोरी केलेले 40 मोबाईल, तीन लॅपटॉप, एक कॅमेरा, आठ मनगटी घड्याळ असे एकूण चार लाख तीनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच पोलिसांना आरोपींकडून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यास यश आले आहे.
अटक आरोपी
1.चंदन दिनेश सहानी (23 वर्ष रा. मुकूंद नगर, गावराईपाडा, वसई पूर्व)
2.मोहित सुदामा सिंग (22 वर्ष रा. मुकुंद नगर, गाचराईपाडा, वसई पूर्व )
3.अविनाश देवा दास ( 18 वर्ष रा.बेलकरीपाडा, स्सफाला पूर्व जि. पालघर)
4.रंजीतकुमार श्रीरोशन मंडल (19 वर्ष, रा. खैरपाडा वसई पूर्व)
पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 2 वसई, उमेश माने- पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, वालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, संदेश हंबीरे, पोलीस नाईक बाळु कुटे, पोलीस शिपाई विनायक राऊत, अभिजीत गढरी, सर्च नेम वालीव पो.ठाणे, पोलीस हवालदार भालचंद बागुल, पोलीस अंमलदार अमोल बरडे, मोहन खांडवी यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.