नांदेड
Trending

Nashik Police News : गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मोठी हालचाल; नाशिकमधील 11 पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

Nashik Police Latest News : शहरात वाढत्या हत्याकांड, लूटमार, टोळक्यांचा दहशतवाद; काही निरीक्षकांना दुय्यम पदांवर देखील बदलण्यात आले

नाशिक | नाशिक शहरात खून, लूटमार, वाहनांची तोडफोड, सोनसाखळी चोरीसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील 11 पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. Nashik Police Transfer News काही अधिकाऱ्यांची दुय्यम पदांवर नियुक्ती करून त्यांना ‘साईड पोस्टिंग’ दिले आहे. Nashik Police Latest News

गेल्या काही महिन्यांपासून शहरात गुन्हेगारीचं प्रमाण धोक्याच्या रेषेवर पोहोचले आहे. जानेवारी ते मे या कालावधीत शहरात तब्बल 25 हत्यांची नोंद झाली असून अनेक गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या आहेत. रात्री उशिरा चौकांमध्ये धुडगूस, गाड्यांची तोडफोड, सामान्य नागरिकांवर दहशत माजवण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.

पंचवटीचे मधुकर कड यांची अंबडला, भद्रकालीचे गजेंद्र पाटील यांची पंचवटीला, अंबडचे गजेंद्र पाटील यांची भद्रकालीला, उपनगरचे जितेंद्र सपकाळे यांची नाशिकरोडला, नियंत्रण कक्षातील संजय पिसे यांची आडगावला, देवळाली कॅम्पचे जयंत शिरसाठ यांची उपनगरला बदली करण्यात आली आहे.

तसेच, सातपूरचे विश्वास पाटील यांची चुंचाळे चौकीत, आडगावचे सचिन खैरनार आणि चुंचाळे चौकीचे मनोहर कारंडे यांची अंबडमध्ये, भद्रकालीचे श्रीनिवास देशमुख यांची देवळाली कॅम्पला, नाशिकरोडचे अशोक गिरी यांची सरकारवाडा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. अंबडचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांना पुढील आदेश होईपर्यंत नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0