• प्रियकराच्या प्रेम संबंध अडथळा पतीचा हत्या केल्याची घटना
विरार :- पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत 03 एप्रिल 2024 रोजी दोन इसम त्यांच्या ताब्यात धारधार शस्त्र बाळगुन दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने धानिवबाग बजरंग चाळ, नालासोपारा पूर्व येथे येणार असल्याबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सोपान पाटील यांना खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. सदरची माहिती सोपान पाटील यांनी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, यांना दिली असता त्यांनी बातमीची सत्यता पडताळून कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेश दिले. आदेशान्वये गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा रचुन 1) पोखन परण साव, (50 वर्षे), 2) अब्दुल मुबारकअली शाह ऊर्फ बड्डा, (23 वर्षे) रा. नालासोपारा यांना ताब्यात घेऊन त्यांची पंचा समक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एक रिक्षा, एक तलवार, एक सुरा, असे धारदार हत्यारे व एक मोबाईल फोन मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. बाबत त्यांचे विरुध्द पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), (3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना करणेबाबत आदेशित केले होते. गुन्हयाचे तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना त्यांचे गुप्तबातमीदार यांच्याकडुन वरील गुन्हयात अटक आरोपीत यांनी 3 वर्षापूर्वी एका इसमाचा खुन केला असल्याबाबत माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सपोनि सोपान पाटील, पोउपनिरी/तुकाराम भोपळे व पोलीस पथकाने अटक आरोपीत यांच्याकडे कौशल्यपुर्वक तपास केला. त्यामध्ये अटक आरोपीत पोखन परण साच (50 वर्षे) वाने त्याचे नायगाव येथे राहणा-या एका महिले सोबत प्रेमसंबध होते. सदर प्रेम संबंधामध्ये सदर महिलेचा पती वकील अहमद बादशाह अहमद इद्दीसी हा अडचण ठरत असल्याने अटक आरोपीत पोखन साव याने त्याचे साथीदार अब्दुल मुबारकअली शाह ऊर्फ बड्डा, व इबान इब्राहिम सिध्दीकी यांचे सह मिळून कट रचुन वकील अहमद यांस दिनांक 03 सप्टेंबर 2021 रात्री 8.30 वाजताचे सुमारास राधा कृष्ण हॉटेल चे जवळ, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग चे कडेला बाफाने गावच्या हद्दीत ता. वसई जि. पालघर येथुन जबरदस्तीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने रिक्षामध्ये बसवुन त्यास शिवीगाळी दमदाटी करुन त्याचा गळा आवळून त्याच्या मानेत डिओ दुचाकीची चाची भोकसुन जिवे ठार मारुन त्याचा खुन करुन त्याचा मृतदेह मौजे भालीवली गावचे हद्दीत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 08 चे गुजरात वाहिनीलगत खड्डयात फेकुन दिला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. आरोपीत याने मयत यास जबरदस्तीने रिक्षात बसविलेली जागा व मृतदेह फेकुन दिल्याची जागा दाखवली असता पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदरची माहिती जितेंद्र बनकोटी , यांना दिली. त्यांनी सदरबाबत सखोल तपास करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने वकील अहमद यास फेकून दिलेल्या ठिकाणाबाबत माहिती घेतली असता विरार पोलीस ठाणे येथे एक अनोळखी इसमाचा मृतदेह दिनांक 06 सप्टेंबर 2021 रोजी कुजलेल्या स्थितीत मिळून आल्याबाबत विरार पोलीस ठाणे अकस्मात मृत्यु सीआरपीसी 174 प्रमाणे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर इसम वकील अहमद ही व्यक्ती हरवले बाबत वालीव पोलीस ठाणे मनुष्य मिसिंग तक्रार दाखल आहे. आरोपी पोखन साव याचेकडे आणखी तपास केला असता त्याने सदर महिलेचा दुसरा प्रियकर विक्रम गुप्ता यांस सुध्दा जिवेठार मारण्याचा कट रचला होता. परंतु तो पूर्ण होवु शकला नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बाबत विरार पोलीस ठाणे गुन्हा भा. दं. वि. स. कलम 302,364,201,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील तीनही आरोपीत यांना पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार गौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शकील शेख, पोलीस निरीक्षक (प्रशासन) व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मीक पाटील, पोलीस अंमलदार मिथुन मोहिते, रवि वानखेडे, संजय मासाळ, किरण आव्हाड, राहुल कर्पे, निखील मंडलिक, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, सर्व नेम पेल्हार पोलीस ठाणे, पोलीस हवालदार नामदेव ढोणे, पोलीस अंमलदार सोहेल शेख,पोलीस उप आयुक्त कार्यालय परिमंडळ 03, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…