Virar Crime News : सोनसाखळी चोरी करणाऱ्या “बंटी-बबली” गजाआड
•मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या नव्याने स्थापित झालेल्या बोळींज पोलीस ठाण्याची कामगिरी ; सोनसकाळी चोरी करणाऱ्या “बंटी-बबली” ला अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल केला जप्त
विरार :- पत्ता विचारायच्या बाहण्याने महिलेच्या गळ्यातील 8.83 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरी प्रकरणी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या नव्याने स्थापित झालेल्या बोळींज पोलीस ठाण्यातील पोलिसांनी “बंटी-बबली” ला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर, दुपारच्या दरम्यान यशवंत अव्हेन्यु बिल्डींगचे पुढे, वाय. के. नगर, विरार येथे फिर्यादी या त्यांची मुलगी व त्यांची मैत्रिण सोबत एक्स्पर्ट स्कुल येथून राहते घरी पायी चालत जात असताना मोटरसायकलवर येणाऱ्या दांपत्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तिथून पळ काढला. त्यादरम्यान महिलेच्या गळ्याला दुखापतही झाली आहे. त्या संदर्भातील महिलेने नव्याने स्थापित झालेले बोळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 309,9(6),3(5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोळींज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी अंमलदारांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटनास्थळी जाऊन 40 ते 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तांत्रिक तपासणी पोलिसांनी आरोपीची प्राथमिक माहिती मिळून आले. मारुती हे ग्लोबल सिटी विरार येथे राहत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ग्लोबल सिटी विरार येथून अटक केली आहे. दिनेश हरेश्वर पारदले (38 वय,रा. ग्लोबलसिटी विरार), आणि त्याची पत्नी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचे विचारपूस केले असता गुन्ह्याची कबुली आरोपींनी केली आहे.गुन्ह्यातील दोन्ही आरोपीअटक करून त्यांच्याकडून 8.83 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ज्याची किंमत 63 हजार रुपये असून चोरीमध्ये वापरण्यात आलेले मोटरसायकल ही पोलिसांनी जप्त केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी हे करत आहे.
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडल-3, राजेंद्र लगारे, सहाय्यक पोलीस आयुक्त नालासोपारा यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र तेंडुलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, बोलींज पोलीस ठाणे, प्रकाश सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी, पोलीस उपनिरीक्षक विष्णु वाघमोडे, सहाय्यक फौजदार जनार्दन मते, पोलीस हवालदार किशोर धनु, पोलीस अंमलदार रोशन पुरकर, प्रफुल सरगर यांनी केलेली आहे.