मुंबई

Virar Crime News : चोरीला गेलेले 35 मोबाईल मूळ मालकांना केले परत; तुळींज पोलिसांची कामगिरी

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; 35 मोबाईल नागरिकांना परत मिळवून देण्यात तुळींज पोलिसांना यश आलं आहे.

विरार :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून मोबाईल चोरी होणे, हरवणे, तसंच गहाळ होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळं पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी विशेष मोहीम राबवून चोरीच्या फोनचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार शहरात चोरी झालेले तब्बल 5 लाख रुपयांचे मोबाईल तुळींज पोलिसांनी नागरिकांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त परत मिळवून दिले आहेत.

तुळींज पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. तर हरवलेले मोबाईल हे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ट्रेस झाले होते.हे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आणि नागरिकांना परत दिले. त्यामुळं आपला मोबाईल परत मिळाल्याचा आनंद मोबाईल धारकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. यावेळी मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार मानले.

दैनंदिन व्यवहारात संपर्क करण्यासाठी, करमणुकीसाठी, फोटो काढण्यासाठी मोबाईलचा अविरतपणे वापर होत असतो. मोबाईलबाबत प्रत्येक व्यक्ती खूप संवेदनशील आहे. मोबाईल हरवला, चोरी झाला अथवा गहाळ झाल्यास संबधित व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये मदती करता येते. यासाठी विशेष मोहीम राबवत आम्ही 5 लाख किंमतीचे तब्बल 35 मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याचबरोबर मोबाईल चोरीला जाणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी देखील केलं आहे.

पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले श्रींगी पोलीस उप आयुक्त सो, परीमंडळ-2 वसई, उमेश माने-पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक आनंद पेडणेकर, बाळासाहेब बनकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल पवार, पोलीस उपनिरीक्षक राहुल फड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, पांडुरंग केंद्रे,आशपाक जमादार, राज जाधव, पोलीस शिपाई छपरीबन, राहुल कदम, शाशिकांत पोटे तसेच पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ 2 नेमणुकीतील पोलीस हवालदार बागुल, पोलीस शिपाई अमोल बड़े यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago