Virar Crime News : विरारमध्ये 1.94 लाखाचा 3 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त, 2 आरोपींना अटक
Virar Crime Branch 3 Seized 2 lakh worth ganja : विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी कारवाई दरम्यान 1.94 लाख रुपयांचा 3 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
विरार :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात अंमली पदार्थ विक्री आणि तस्करी करणाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त आयुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेला मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा कक्ष-3, विरार यांच्या पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाच्या युनिटकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान 1.94 लाख रुपयांचा 3 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी विरार परिसरातील राहणारे असून पोलिसांनी त्यांना अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक केली आहे. गुन्हे शाखा कक्ष-3 पेट्रोलिंग च्या दरम्यान विरार पूर्व येथील नारंगी रेल्वे फाटा जवळ मोटरसायकल वरून जात असताना पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून गांजा अंमली पदार्थ जप्त केला आहे .पोलिसांनी आरोपींकडून गांजा सह मोटरसायकल ही जप्त करून एकूण 1 लाख 94 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राहुल नंदु घरत (24 वय रा.नारंगी गाव, विरार पूर्व,) अक्षय अनिल पडयाळ, (28 वय, रा. डोंगर पाडा, देशमुख गल्ली, विरार पूर्व) असे आरोपीचे नाव आहे.आरोपी विरुध्द विरार पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कलम 8 (क), 22 प्रमाणे. गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास विरार पोलीस ठाणे Virar Police Station करीत आहे.
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक / प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुमीत जाधव, युवराज वाघमोडे, सुनिल पाटील, मनोहर तारडे, तुषार दळवी, अतिष पवार, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 विरार तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सायबर सेल यांनी पार पाडली आहे.