Virar Crime Branch Unit 3 caught 13 kg worth ganja: विरारमध्ये गांजा विक्रीसाठी आणलेला 8 लाख 72 हजार रुपयांचा 13.5 किलो गांजा गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी जप्त केला आहे
विरार :- विरारमध्ये विक्रीसाठी आणलेला 8 लाख 72 हजार 760 रुपयांचा 13.5 किलो गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-3 Virar Crime Branch Unit 3 पथकाने जप्त करून दोघांना अटक केली. संतोष रामजीत जैसवार (वय 26 रा. लल्लु भाई कंम्पाऊन्ड, मानखुर्द पश्चिम) विकास धनंजय झिजुटे (वय 22 रा. शिवाजी छत्रपती चाळ, साठेनगर, मानखुर्द पश्चिम, मुंबई) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात अंमली पदार्थ विक्री आणि तस्करी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करून त्याबद्दल पायबंद करण्यातबाबत सुचना वरिष्ठांनी दिलेल्या आहे.गुन्हे शाखा कक्ष-3 विरार चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलिंग दरम्यान शनिवारी (9 नोव्हेंबर) रोजी रात्री दरम्यान वसई पूर्व, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात मार्गावर शिवाचा पाडा जवळील बंद अवस्थेत असलेला सायली पेट्रोलपंप जवळ बलेनो कार मधुन आरोपी हे गांजा हा अंमली पदार्थ एकुण वजन 13.5 किलोग्राम वजनाचा एकूण 8 लाख 72 हजार 760 रु किंमतीचा मुद्देमाल तस्करी करताना मिळून आले आहेत. आरोपी विरुध्द पेल्हार पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कलम 8(क), 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पेल्हार पोलीस ठाणे करत आहे.
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहा प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, ज्ञानेश्वर आव्हाड, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, युवराज वाघमोडे, सुनिल पाटील, अतिष पवार, मनोहर तारडे, तुषार दळवी, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 विरार यांनी पार पाडली आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…