Virar Crime Branch : वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्या एकाला पकडले; गुन्हे शाखा कक्ष-3 विरार पोलिसांची कारवाई

Virar Crime Branch Arrested Robbers : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत परिसरात पेट्रोल पंप आणि हॉटेलवर पार्किंग केलेल्या वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्या चोरट्यांना विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-3 पोलिसांनी मुद्देमालासह पकडले.
विरार :- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत लगेत असलेल्या हॉटेल आणि पेट्रोल पंप येथे पार्किंग करून ठेवलेल्या ट्रक/टैंकर्सच्या बॅटरी चोरी करणाऱ्या Battery Robbery चोरट्याला विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष- 3 Virar Crime Branch Unit 3 पोलिसांनी मुद्देमालासह पकडले आहे.या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.किरण विष्णु गि-हाणे, (वय 32 रा. ता. विक्रमगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,भारत पेट्रोलपंपाचा मागे शिरसाड वसई, जि. पालघर येथुन फिर्यादी याच्या दोन ट्रक मधील 38 हजारांच्या चार बॅटऱ्या चोरीला गेल्याचे तक्रार मांडवी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील खानिवडे ते वसई फाटा दरम्यानच्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय माहामार्गालगत रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या ट्रक/टैंकर्सच्या बॅटरी चोरीचे गुन्हयांत मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याने घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवून आरोपीचा शोध घेवून कारवाई करणे बाबत सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उप आयुका गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हयाचे तपासादरम्यान घटनास्थळावरील उपलब्ध सि.सि.टी.व्ही. फुटेज मध्ये संशयीत आरोपी व आरोपीची कार निष्पन्न झाले. पोलिसांनी कौशल्यपुर्ण तपास करुन मिळालेल्या गोपणीय बातमीवरुन आरोपी किरण विष्णु गि-हाणे, याला दिनांक 16 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेवुन गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून स्विफ्ट डिझायर कार, तब्बल 46 चोरीच्या बॅटऱ्या आणि इतर साहित्य असा एकूण आठ लाख 77 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीच्या विरोधात 10 गुन्हा दाखल असून यापूर्वी 4 गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सारे (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.