क्राईम न्यूज

Virar Crime Branch News : नालासोपाऱ्यात ज्वेलर्सवर सशस्त्र दरोड्याचा डाव उधळला! विरार गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; नेपाळ आणि यूपीच्या टोळीला बेड्या

Virar Crime Branch Arrested Criminal : अग्निशस्त्र, काडतुसे आणि कटरसह दरोडेखोर अटकेत; सराईत गुन्हेगार इरशाद खानसह 4 जण पोलिसांच्या जाळ्यात

नालासोपारा/विरार | नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानकाजवळील एका ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीचा विरार गुन्हे शाखा कक्ष-3 ने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे नालासोपाऱ्यातील एक मोठी लूट टळली आहे. Virar Crime Branch

गुप्त माहितीवरून ‘दिपा बार’मध्ये धाड

29 डिसेंबर 2025 रोजी विरार गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी शाहूराज रणवरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, नालासोपारा स्टेशनजवळील ‘दिपा बार’मध्ये पाच जण संशयास्पद रित्या शस्त्रांसह बसले आहेत. हे आरोपी परिसरातील एका ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी बारमध्ये छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच पाचवा आरोपी मोहम्मद हा पळून जाण्यात यशस्वी झाला, मात्र पोलिसांनी चौघांना शिताफीने ताब्यात घेतले.

‘रिषभ ज्वेलर्स’ होते लक्ष्य

अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी नालासोपारा पूर्व येथील टाकी रोडवर असलेल्या ‘रिषभ ज्वेलर्स’ या दुकानात दरोडा टाकण्याची पूर्ण तयारी केली असल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

1 अग्निशस्त्र (पिस्तूल) आणि 3 जिवंत काडतुसे.

पिस्तूलसारखा दिसणारा लायटर.

कटर, स्क्रू ड्रायव्हर आणि अणकुचीदार टोचा.

उत्तर प्रदेश आणि नेपाळ कनेक्शन
अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे धागेदोरे उत्तर प्रदेश आणि नेपाळपर्यंत पसरलेले आहेत.

1.इरशाद नियाज खान (42 वर्ष) – मूळचा लखनौ, उत्तर प्रदेश. (यावर यापूर्वी हत्या आणि दरोड्याचे 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत).

2.रेवाथर दुर्गादत्त भट्ट – मूळचा नेपाळ.

3.मोहनसिंग जोगीसिंग सवत – मूळचा नेपाळ.

4.सुमीत पप्पू रावत – मूळचा लखनौ, उत्तर प्रदेश.

आरोपी इरशाद खानचा गुन्हेगारी इतिहास

टोळीचा प्रमुख इरशाद खान हा खतरनाक गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबईतील काळाचौकी (कलम 302 – हत्या), माहीम, वांद्रे आणि गुजरातच्या उमरगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आचोळे पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप-आयुक्त संदीप डोईफोडे आणि सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र पाटील आणि त्यांच्या टीमने उत्कृष्टरित्या पार पाडली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago