क्राईम न्यूज

Virar Chain Snacher News : बोळींज पोलिसांची मोठी कामगिरी: चैन स्नॅचिंग करणारे त्रिकुट 24 तासांत जेरबंद

Virar Bolinj Police Arrested Chain Snacher : वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पसार झालेल्यांना अटक; 5 लाखांची कार जप्त

विरार :- विरारमधील बोळींज येथे पायी चालत जाणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून पळणाऱ्या तीन आरोपींना बोळींज पोलिसांनी Virar Bolinj Police अवघ्या 24 तासांच्या आत अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी या गुन्हेगारांकडून गुन्ह्यात वापरलेली 5 लाख रुपये किंमतीची कारही जप्त केली आहे. या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. Virar Latest Crime News

30 जुलै रोजी दुपारच्या सुमारास रंजना कालेकर (53 वय) या त्यांच्या नातीला शाळेत सोडून घरी परत येत होत्या. त्याचवेळी एका अनोळखी व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ येत गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली आणि पसार झाला. या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि पोलीस उप आयुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासाचे आदेश दिले.

पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग घेतला. त्यानंतर, मुंबईतील भांडुप परिसरातून अब्दुल मोबीन खान (28 वय) आणि मोहम्मद झिशान अहमद (34 वय) या दोघांना, तर ठाण्यातील दिवा येथून चेतन सुरेश वाघ उर्फ कोबरा (24 वय) याला अटक केली.

चौकशीदरम्यान, आरोपींनी जबरी चोरी केलेली सोन्याची चैन कांजुरमार्ग येथील एका फायनान्स कंपनीत गहाण ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, या आरोपींनी अशाच प्रकारे सफाळे, पालघर येथेही चैन स्नॅचिंगचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश सावंत यांच्या नेतृत्वाखालील या पथकात पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी, पोलीस उपनिरीक्षक विष्णु वाघमोडे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी आणि जवान सहभागी होते. या कामगिरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा विश्वास वाढला आहे.

vivek

Recent Posts