Vinod Tawde : “माहिती नसताना वक्तव्य करणे म्हणजे बालिशपणा,” राहुल गांधींच्या आरोपांवर विनोद तावडेंचा पलटवार
Vinod Tawde On Rahul Gandhi : भाजप नेते तावडे यांनी राहुल गांधी यांना स्वत: नालासोपारा येथे येऊन तेथील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पाहून निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीची संपूर्ण माहिती घेण्यास सांगितले.
मुंबई :- भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे Vinod Tawade यांच्यावर मंगळवारी (19 नोव्हेंबर) नालासोपारा येथे पैसे वाटल्याचा आरोप झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनीही विनोद तावडेंच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर याप्रकरणी प्रश्न उपस्थित केले. काँग्रेस नेत्याच्या आरोपांवर आता विनोद तावडेंनी पलटवार केला आहे.
विनोद तावडे म्हणाले की, राहुल गांधी यांनी कोणतीही ठोस माहिती न देता नालासोपारा येथे झालेल्या निवडणूक प्रक्रियेबाबत वक्तव्य केले आहे.आपण स्वत: नालासोपारा येथे यावे आणि तेथील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पहावे, असे तावडे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.नालासोपारा येथे येऊन तेथील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज बघून तेथील निवडणूक आयोगाची संपूर्ण कार्यवाही पाहा आणि पैसे कसे आले हे सिद्ध करा.भाजप नेते तावडे यांनी राहुल गांधींचे वक्तव्य बालिश असल्याचे म्हटले आहे. कोणतीही माहिती नसतानाचा हा प्रकार बालिश नसेल तर दुसरे काय आहे, असे ते म्हणाले.
विनोद तावडे यांची पत्रकार परिषद रद्द
निवडणूक आयोगाची सूचना मला पोलिसांमार्फत मिळाली. त्यांनी पत्रकार परिषद न घेण्याची सूचना केली होती. त्यामुळे नालासोपारा प्रकरणी पत्रकार परिषद मी रद्द केली आहे.