क्राईम न्यूज

Vinod Patil ED Inquiry : मनसे नेते राजू पाटलांचे भाऊ विनोद पाटील यांची ईडीकडून 10 तास कसून चौकशी

ED Enquiry ON Raju Patil : लोढा ग्रुपच्या फसवणूक प्रकरणात कारवाई; आर्थिक गैरव्यवहारासंबंधी पुन्हा चौकशीची शक्यता, अडचणी वाढल्या

मुंबई :- मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांचे बंधू विनोद पाटील यांची लोढा ग्रुपच्या विश्वस्त फसवणूक प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) तब्बल 10 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांनी केलेल्या जमीन आणि टीडीआर आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर या प्रकरणात आता ईडीची एन्ट्री झाली आहे.

या प्रकरणात राजेंद्र लोढा आणि विनोद पाटील यांच्यासह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल आहे आणि मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) याआधीच तपास सुरू आहे. लोढा ग्रुपच्या विश्वस्तांचा विश्वासघात आणि फसवणूक प्रकरणी आता ईडीने राजेंद्र लोढा यांच्या पाठोपाठ विनोद पाटील यांच्याकडेही चौकशीचा मोर्चा वळवला आहे.

विनोद पाटील यांची आज 10 तास चौकशी झाल्यानंतर, पुन्हा एकदा त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीच्या पथकाने विनोद पाटील यांचा जबाब नोंदवून घेतला असून, यामुळे विनोद पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago