महाराष्ट्र

Vinesh Phogat Julana Vidhan Sabha : कुस्तीपटू विनेश फोगटचा विजयी!

 Vinesh Phogat Julana Vidhan Sabha Seat Result 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगट विजयी झाल्या आहेत. जुलाना विधानसभा मतदारसंघातून विनेश निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. आपल्या विजयाचा आनंद साजरा करताना कुस्तीपटू बजरंग पुनियाने एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

ANI :- हरियाणा निवडणुकीत विनेश फोगटने Vinesh Phogat Julana Vidhan Sabha शानदार विजय नोंदवला आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आपल्या विजयाचा झेंडा फडकवला आहे. या सीटवर विनेशला सुरुवातीपासूनच आघाडी होती, ज्याचा निकाल तिच्या बाजूने लागला.विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकनंतर कुस्तीतून निवृत्ती घेतली होती, त्यानंतर तिने हरियाणामध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गुरु, प्रशिक्षक आणि वडिलांसारखे काका महावीर फोगट हे विनेशच्या या निर्णयाच्या विरोधात होते. पण, तरीही विनेशने निवडणूक लढवली.

विनेश फोगट यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत एकूण 5761 मतांनी विजय मिळवला. जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगट यांनी भाजपचे कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव केला. आता विनेशच्या शानदार विजयाबद्दल तिच्या अभिनंदनाचा पूर आला आहे.

भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया विनेशचे अभिनंदन करण्यात आघाडीवर आहे. सुरुवातीपासूनच विनेशच्या पाठीशी उभ्या असलेल्या बजरंगने तिचा विजय तर साजरा केलाच शिवाय काही महत्त्वाचे सांगितले.विनेश फोगटच्या विजयावर बजरंग पुनिया म्हणाले की, ही लढत फक्त जुलाना जागा किंवा 3-4 उमेदवारांविरुद्ध नाही. ही केवळ पक्षांमधील लढाई नव्हती. उलट, ही लढाई देशातील बलाढ्य दमनकारी शक्तींविरुद्ध होती, ज्यात विनेशचा विजय झाला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago