Vikrant Patil : भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती

पनवेल (जितीन शेट्टी) : भाजपा महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री विक्रांत पाटील Vikrant Patil यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील त्यांच्या वरती प्रेम करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांनी सार्वजनिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला.
तसेच पनवेल येथे राज्यभरातून भाजपा पदाधिकारी आणि अन्य पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भेट देऊन शुभेच्छारुपी आपले प्रेम व्यक्त केले. या शुभप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर जी मोहोळ Murlidhar Mohol यांनी उपस्थित राहत आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी बोलताना म्हणाले की विक्रांत जी यांचे पक्ष संघटना तसेच राज्यभरातील पदाधिकारी आणि नागरिक यांना प्रेरणा देणारे व उत्कृष्ट कार्य त्यांनी नेहमी केलेले आहे म्हणून नक्कीच आगामी काळात त्यांना चांगली संधी मिळू शकते व त्यासाठी त्यांच्या कडून देखील शुभेच्छा देऊन वाढदिवसाची शोभा वाढवली गेली. Panvel Latest News





याप्रसंगी नागरिकांना वाढदिवसानिमित्त कामगार मोर्चाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी भांड्यांचे किट,रिक्षाचालक यांना सीएनजी कूपन, गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या, छत्री तसेच रेनकोट वाटप केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेश महासचिव श्री विक्रांत पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री राहल लोणीकर, मराठवाडा संघटनमंत्री श्री संजय जी कौडगे व मा. कोकण म्हाडा सभापती श्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अनेक नागरिकांनी आपल्या शुभेच्छा नाविन्य पद्धतीने व विविध प्रकारे व्यक्त करुन भविष्यात अत्यंत चांगली उंची पादक्रांत करावी असे सांगतीले. Panvel Latest News