क्राईम न्यूज

Vikhroli Drug News : विक्रोळीत पोलिसांचा ‘एमडी’ तस्करांना दणका; 2 लाख रुपये किमतीच्या अमली पदार्थासह एकाला अटक

Mumbai Vikhroli Police Arrested Drug Paddlers : गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी लावला सापळा, आरोपीने पळून जाण्याचा केला प्रयत्न

मुंबई :- विक्रोळी परिसरात एमडी (MD) या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 2 लाख रुपये किमतीचे 10 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. मुंबईत अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. Mumbai Latest Crime News

मंगळवारी रात्री विक्रोळी परिसरात पोलीस गस्त घालत असताना, त्यांना एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. एक व्यक्ती परिसरात अमली पदार्थ विकण्यासाठी येणार आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सापळा रचला. Mumbai Latest Drug News

काही वेळाने, संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी हटकले. पोलिसांना पाहताच तो अधिक वेगाने पुढे जाऊ लागला. पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी काही अंतर पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. Mumbai Police Latest News

10 ग्रॅम एमडी जप्त

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव सर्फराज कुरेशी (वय 32) असल्याचे समोर आले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 10 ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ सापडला. बाजारात या 10 ग्रॅम एमडीची किंमत सुमारे 2 लाख रुपये आहे.

पोलिसांनी आरोपी सर्फराज कुरेशीवर अमली पदार्थ तस्करी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मुंबईत सध्या अमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू असून, विक्रोळी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

vivek

Recent Posts