पुणे
Trending

Lonavala News : लोणावळा निवडणुकीत भाजपला कोंडीत पकडण्याचा डाव! राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र

Lonavala Political News : आमदार सुनील शेळकेंच्या प्रयत्नांना यश; शरद पवार गटाचा अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा, राजकीय समीकरणे बदलली

लोणावळा :- राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असताना, लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत एक निर्णायक राजकीय घडामोड समोर आली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे, ज्यामुळे लोणावळ्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजप विरुद्ध संयुक्त राष्ट्रवादीची लढत

मागील काही दिवसांपासून लोणावळ्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तीव्र संघर्ष दिसून येत होता. आता दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र येत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार गटाने दिलेला हा बिनशर्त पाठिंबा केवळ राजकीय निर्णय नसून, लोणावळ्यात राष्ट्रवादीच्या पायाभरणीचा मोठा आधार ठरू शकतो.

आमदार सुनील शेळके हे या एकत्रित येण्याच्या प्रक्रियेचे प्रमुख रणनीतिकार ठरले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्या आहेत.या एकत्रित येण्याचा सरळ फायदा लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होणार असून, यामुळे नगरपरिषद निवडणूक आता भाजप विरुद्ध संयुक्त राष्ट्रवादी अशी होणार आहे.विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक 13 मध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचेही अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. लोणावळ्यातील ही नव्याने उभी झालेली राजकीय मैत्री निवडणुकीसाठी ‘गेम-चेंजर’ ठरू शकते.

सन्मान जपण्याचे आश्वासन

या राजकीय युतीवर बोलताना अजित पवारांच्या पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे आश्वासन दिले. “येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आदरणीय शरद पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना त्याच पद्धतीने योग्य तो सन्मान दिला जाईल. नगरपालिका, वडगावची नगरपंचायत आणि इतर शासकीय समित्यांच्या बाबतीतही सकारात्मक निर्णय घेऊ,” असे शेळके यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नासीर शेख यांनीही, स्थानिक पातळीवर चर्चा करून हा बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0