Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचे राजकारण भाजपाने केले
•हे सरकार काम करते तर मग एसटी कर्मचाऱ्यांचा संप करण्याची वेळ आली का? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
मुंबई :- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासह इतर मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या 11 संघटनांनी मंगळवारपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 50% बससेवा ठप्प होती, त्यामुळे एसटी महामंडळाचा एका दिवसात 14 ते 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. या सर्व घडामोडीवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत ट्विट केले आहे. ते म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे भाजप आणि राजकारण केले होते. तसेच सरकारमध्ये काम करणारे जर बोलत असेल सर्व व्यवस्थित चालू आहे मग संप करण्याची वेळ का? असा सवालही यावेळी उपस्थित केला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
हे सरकार काम करते तर मग एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्याची वेळ आलीच का? या सरकार मध्ये कामे कोणाची होत आहे?
महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे राजकारण भाजपने केले होते. भाजपच्या नेत्यांनी मुद्दाम राजकारण करून संप भडकवण्याचे काम त्यावेळी केले.
आज राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यांनी आता कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सरकारने विचार करावा.
गणपती आणि ऐन सणासुदीच्या काळात एसटी चा संप सुरू झाल्याने सामान्य प्रवाशांना प्रवासात अनेक अडचणींना आणि आर्थिक खर्चाला सामोरे जावे लागत आहे.
एसटी कर्मचारी आणि राज्यातील सामान्य प्रवाशी दोघांचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि तातडीने हा संप सोडवावा ही आमची मागणी आहे.