Congress Leader Vijay Wadettiwar On Maharashtra Sarkar : “1980 मध्ये 14 आमदार असतानाही नेमणूक झाली होती!” – काँग्रेस नेत्यांनी जुन्या परंपरेचा दिला दाखला; सभापतींच्या ‘असंविधानिक’ वक्तव्यावरही तीव्र आक्षेप.
नागपूर :- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात Winter Session दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते अधिकच आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी आज पत्रकार परिषदेत सत्ताधारी महायुती सरकारला थेट आणि संतप्त सवाल विचारत धारेवर धरले.”आम्ही विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव दिलंय, तर तुम्हाला विरोधी पक्ष नेता नेमण्यास काय दुखणं आहे?” असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका करताना जुन्या घटनांचा दाखला दिला. ते म्हणाले, राज्यात 1980 मध्ये केवळ 14 आमदार असताना आणि 1985 मध्ये 16 आमदार असतानाही विरोधी पक्षनेता नेमला गेला होता. मात्र सध्या सरकारची नियती ठीक नसल्यामुळे संविधानिक पद रिक्त ठेवून सरकार मनमानी कारभार करत आहे. जर सत्ताधाऱ्यांना लोकशाहीवर आधारित सरकार चालवायचे नसेल, तर त्यांना संविधान आणि लोकशाही मान्य नाही, हाच त्याचा स्पष्ट अर्थ होतो.
सभापतींच्या वक्तव्यावरही आक्षेप
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी ‘स्वातंत्र्यनंतरच्या काही प्रथा परंपरा पाळण्याची गरज नसल्याचे’ विधान केले होते. यावरही वडेट्टीवार यांनी जोरदार आक्षेप घेतला. ते म्हणाले, हे पद प्रथा किंवा परंपरा नाही, तर हे संविधानिक पद आहे. सभापतींच्या खुर्चीवर बसून अशाप्रकारचे असंविधानिक वक्तव्य करणे चुकीचे आहे. सरकारला नियमानुसार काम करायचे नाही, हेच यातून स्पष्ट होते. सव्वा वर्ष होऊनही विरोधी पक्षनेता नसणे, हे सरकारला भूषणावह नाही, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…