Vijay Wadettiwar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माफीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा संशय !

•राज्याचे विरोधी पक्षनेते Vijay Wadettiwar यांनी ट्विट करत नरेंद्र मोदी यांच्या माफीवर संशय व्यक्त केला आहे, तर मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यावरही टीका केली आहे
मुंबई :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर असून आज वाढवन येथे जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावरील घटनेबाबत जाहीर माफी मागितली आहे. परंतु राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माफी बद्दल संशय व्यक्त केला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावरही टीका केली आहे.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, त्यानंतर पाच दिवसांनी महाराष्ट्रात दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान यांनी आज शिवप्रेमींची माफी मागितली.
पण पुतळा कोसल्यावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले ताशी 45 किमी वेगाने वारे वाहत होते म्हणून पुतळा कोसळला.ज्याने पुतळा बनवला तो शिल्पकार फरार आहे,कारवाई नाही
मंत्री केसरकर म्हणाले काही तरी चांगले व्हायचे असेल म्हणून पुतळा कोसळला असेल.
सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी असताना पुतळा प्रकरणी बोटं नौदल कडे दाखवले!
पंतप्रधान यांनी माफी मागितल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेतला असता तर त्या माफीवर विश्वास बसला असता. पण कृतीत काहीच नाही, फक्त पोकळ शब्द आहेत!
त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुका समोर ठेवून फक्त माफी मागितली का, हा संशय येतोय.