•विरोधी पक्षनेते वडेट्टीवार गळ्यात कापसाची माळ घालून विधानभवनात दाखल; ‘फसवणीस सरकार’ असे फलक झळकवत तातडीने कर्जमाफी आणि योग्य बाजारभावाची मागणी
नागपूर :- नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या (9 डिसेंबर) कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या आमदारांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरत “शेतकरी उपाशी, सरकार तूपाशी!” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गळ्यात कापसाच्या बोंडांची माळ घालून विधानभवनात प्रवेश केला, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकत्र येत ‘फसवणीस सरकार’ असे स्पष्टपणे लिहिलेले निषेधाचे फलक हातात घेतले होते. याशिवाय “कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची झाली माती!”, “शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व आमदार सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था मांडली. ते म्हणाले की, विदर्भात अधिवेशन असूनही कापूस, सोयाबीनसह इतर शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. सध्या कापसाला केवळ 7 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत आहे, तर सोयाबीनलाही भाव नाही. “कुठला हमीभाव आहे? कुठे कापसाला दर आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. शेतकऱ्याला केवळ 15 क्विंटल हेक्टरी मदतीची घोषणा केली जात आहे, पण शेतकऱ्याला 10 ते 15 क्विंटल कापूस येत असेल, तर तो विकणार कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, सरकारची शेतकऱ्यांप्रती अजिबात आस्था नाही. शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून, महाविकास आघाडीने सरकारकडे संपूर्ण कर्जमाफी, उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव, तात्काळ नुकसानभरपाई आणि खरेदी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत महाविकास आघाडी आपला लढा सुरू ठेवेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…