महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : भाजपवाल्यांना महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आणायचे आहे का? विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार

•रावसाहेब दानवे यांच्यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

जालना :- राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. जवखेड गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी एका शेतकऱ्यांची जमीन जबरदस्तीने हस्तगत करण्याकरिता रावसाहेब दानवे संतोष दानवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संत्रे कुटुंबीयांना मारहाण करून जबरदस्तीने त्यांचे घर पाडल्याचा गंभीर आरोप दानवे कुटुंबावर केला असून राज्यात भाजपवाल्यांचा गुंडांचे राज्य आणायचे आहे का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे असे वडेट्टीवार म्हणाले आहे.

भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी संत्रे कुटुंबाला केलेली मारहाण म्हणजे सत्तेचा माज आहे. एखाद्या गावात जमिनीवर नजर पडली तर ती जागा दानवे यांना मिळालीच पाहिजे. मालकाने जमीन देण्यास नकार दिला तर घर जबरदस्तीने पाडून कुटुंबाला मारहाण करण्यात येते.

गरीब बहुजन कुंभार समाजातील असलेले संत्रे कुटुंब दिवस रात्र कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत आहे. पण जमीन हडपण्यासाठी या कुटुंबाला रावसाहेब दानवे आणि भाजपच्या गुंडांकडून त्रास दिला जातो, मारहाण केली जाते. भाजपवाल्यांना महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आणायचे आहे का?

पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन काय करत आहे?
जवखेडा गाव, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचा आमदार पुत्र संतोष दानवे यांच्या गुंड कार्यकर्त्यांना आता कंटाळला आहे. मारहाण करून घर उध्वस्त केल्याचा गंभीर आरोप संत्रे कुटुंबियानी त्यांच्यावर केला आहे.

जवखेडा गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753, एम.साठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी कुंभार समाजाच्या संत्रे कुटुंबाला मारहाण केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने घर उध्वस्थ केले असा, आरोप पीडित संत्रे कुटूंबानी केला आहे. अज्ञात आठ ते दहा जणांनानी रात्रीच्या सुमारास घरात घुसून मारहाण करत घर उध्वस्थ केल्याची घटना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावात घडली आहे. जवखेडा गावातील कुंभार समाजाच्या संत्रे कुटुंबियांनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून न्याय मिळावा मागणी केली आहे. या प्रकारणी हसनाबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे .या तक्रारीच्या आधारे हसनाबाद पोलिसांनी आज्ञात आठ ते दहाजणा विरुद्ध संत्रे कुटूंबियांना मारहाण करून त्यांचं घर उध्वस्त केल्या प्रकारणी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. परंतु हा तपास समाधानकारक नाही.

हाय वे जात असताना स्वतःच्या जमिनी, घर वाचवायचे पण दुसऱ्यांची जमीन घ्यायची ही सत्तेतील मस्ती आहे. आम्ही ही मस्ती उतरवणार. संत्रे कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.या कुटुंबाला काही झालं तर रावसाहेब दानवे आणि त्यांचे कुटुंब याला जबाबदार ठरेल. संत्रे कुटुंबाने दानवे यांचे नाव घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दखल करून चौकशी झाली पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0