मुंबई

Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा “लाडका मंत्री”योजनेचा आणखी एक लाभार्थी ; राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे ट्विट

•शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप, 500 कोटीचा भूखंड कवडीमोलाच्या भावात दिलं असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

मुंबई :- राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडवणारे ट्विट‌ करत शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्र्यांचा “लाडका मंत्री” योजनेचे आणखी एक लाभार्थी समोर आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केले आहे. नवी मुंबईतील एक भूखंड राज्याचे मंत्री संजय राठोड यांना कवडीमोल भावात दिल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. या संदर्भातील ट्विट करत भूखंडमध्ये गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे.

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
मुख्यमंत्र्यांचा ‘लाडका मंत्री‘ असतो तेव्हा काय काय होऊ शकते बघा..

तब्बल ५०० कोटी रुपयांचा भूखंड अवघ्या एक रुपये प्रती चौरस मीटरच्या किंमतीत मिळू शकतो. दुसऱ्यांच्या जमिनी फुकटात हडपू शकतात.

मुख्यमंत्र्यांच्या “लाडका मंत्री” योजनेचा आणखी एक लाभार्थी महाराष्ट्रापुढे आला आहे.

1 नोव्हेंबर 2023 रोजी, राज्याच्या नगरविकास विभागाने एक भूखंड श्री.संत डॉ.रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टला हस्तांतरित करण्यात आल्याचा उल्लेख करणारा शासन निर्णय प्रसिद्ध झाला

मात्र मंत्रिमंडळाची कोणतीही मान्यता न घेता हा निर्णय झाल्याचे आता समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांचे लाडके मित्र मंत्री संजय राठोड यांच्या दबावात बेलापूर, नवी मुंबई येथील 5600 चौ.मी. भूखंड श्री.संत डॉ. रामराव महाराज चॅरिटेबल या ट्रस्टच्या नावाने वाटप करण्यात आला.

मतांसाठी लाडक्या बहिणीला 1500/- रुपये, आणि लाडक्या मंत्र्याला 500 कोटींचा भूखंड कवडीमोल भावात. महाराष्ट्राची लूट जिथे मिळेल तिथे कशी सुरू आहे बघा!

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

40 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago