Vijay Vadettiwar : “लाडके गुंड” विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
Vijay Vadettiwar Tweet For Chandrakant Patil : दहीहंडी कार्यक्रमात कुख्यात गुंडा गजानन मारणे यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे केले स्वागत, विरोधकांकडून टीका
पुणे :- गुंडा गजानन मारणे यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे दहीहंडी Dahihandi निमित्त एका कार्यक्रमात स्वागत केले होते.मंत्री चंद्रकांत पाटील Chandrkant Dada Patil यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. चंद्रकांत पाटील यांनीही पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणे यांना हात जोडून त्यांचे स्वागत स्वीकारले आहे.गजानन मारणे यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना अनेक वेळा पुण्यातून तडीपारही करण्यात आले होते. अशातच गजानन मारणे यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचे स्वागत केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट Vijay Vadettiwar करत “लाडके गुंड”अशी उपमा दिली आहे.
विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
‘लाडके गुंड‘
कुख्यात आणि महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी देखील पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले.
पुण्यातील कोथरूड भागात असलेला गजानन मारणे, त्याच कोथरुड मधील आमदार चंद्रकांत पाटील. लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी असतात पण परत निवडून येण्यासाठी आजच्या परिस्थितीत महायुतीला लाडके गुंड महत्वाचे आहे म्हणून सत्कार चमत्कार गुंडाकडून घेतले जात आहे.या भागातील नागरिकांना अश्या गुंडपासून संरक्षण देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना मंत्री महोदय गुंडाला ‘राजाश्रय‘ देत आहे.
भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार यांनी आणि त्यांच्या मुलाने पोलिसांची इज्जत कशी काढली हे काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्राने live पाहिले.
पोलिसांना धमकावण्याचा असा माज खासदार नारायण राणे आणि त्यांचा मुलगा निलेश राणे यांना कुठून आला हा प्रश्न जनतेला पडला होता. त्याचे उत्तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले आहे.
या राज्यात पोलिसांची इज्जत राहिली नाही. मंत्री गुंडांकडून सत्कार करून घेतात, आमदार पोलिसांना शिवीगाळ करतात, धमकावतात.
जिथे गुंडांना राजाश्रय मिळत आहे तिथे सामान्य जनतेने आपले रक्षण होईल या भाबड्या आशा ठेवू नये.
गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या या सरकारला आता जनतेने पुष्पगुच्छ देऊन निरोप द्यावा हीच राज्यातील जनतेला विनंती.