Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट, समजूतीतून काढला मार्ग
मुंबई :- माजी मंत्री विजय शिवतारे Vijay Shivtare यांचे बंड शमवण्यात अखेर सरकारला यश आल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत अजितदादा आणि शिवतारे यांच्यात दिलजमाई झाल्याची माहिती आहे.माजी मंत्री विजय शिवतारे यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली. गेल्या 10 ते 12 दिवसांनपासून त्यांनी अजित पवार यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेत, पवार कुटुंबियांविरोधात मोठा मोर्चा उघडला होता. या 10 दिवसांत त्यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका देखील केली होती. यावर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना निर्वाणीचा इशारा देखील दिला होता. अखेर विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात दिलजमाई झाल्याची चर्चा आहे. Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election
बारामतीमधून अपक्ष लढवण्याची शिवतारेंची भूमिका
सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुर आहे. इथून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं या मतदारसंघातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची भूमिका माजी मंत्री विजय शिवतारे यांनी घेतली होती. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती. कोणत्याही परिस्थितीत मी बारामती निवडणूक लढवणारचं असा निर्धार शिवतारेंनी केला होता. मात्र,रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवतारेंची मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघल्याचे बोलेल जात आहे. Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election
विजय शिवतारे यांच्या भूमिकेकडे लक्ष
बारामती लोकसभा मतदारसंघात काय होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच बारामतीतून निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत. जनतेला पर्याय हवा आहे, असे सांगत विजय शिवतारे यांनी पवारांवर जोरदार टीका केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसह झालेल्या बैठकीनंतर आता विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम राहतात की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी शिष्टाई फळाला येऊन माघार घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election