पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात; विराट कोहली भावूक, विजय मल्ल्याचा ‘ई साला कप नामदे’ संदेश
आयपीएल 2025च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने पंजाब किंग्सवर अवघ्या 6 धावांनी निसटती विजय मिळवत आपल्या 18 वर्षांच्या इतिहासातील पहिलं विजेतेपद पटकावलं. या विजयाने बंगळुरूच्या चाहत्यांचं बहुप्रतिक्षित स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरलं.
सामना अत्यंत चुरशीचा ठरला. बंगळुरूच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत संयम राखत पंजाबचा डाव अडवला आणि सामना आपल्या बाजूने वळवला.
कोहलीच्या डोळ्यांत आनंदाश्रू
या ऐतिहासिक विजयाच्या क्षणी संघाचा दीर्घकालीन आधारस्तंभ विराट कोहली भावूक झाला. मैदानातच तो अश्रूंना वाट मोकळी करून रडताना दिसला. 2008 सालापासून आरसीबीसाठी खेळत असलेल्या कोहलीने संघाच्या पहिल्या विजयानंतर भावना व्यक्त करत म्हटलं, “हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सगळ्यात खास क्षण आहे.”
विजय मल्ल्याची प्रतिक्रिया; ट्रोलही
RCBचे माजी मालक विजय मल्ल्यांनी संघाच्या विजयानंतर एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत लिहिलं – “रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अखेर 18 वर्षांनंतर चॅम्पियन बनले! संतुलित संघ, उत्कृष्ट मार्गदर्शन आणि बोल्ड खेळामुळे हा विजय शक्य झाला. खूप खूप शुभेच्छा – ई साला कप नामदे!”
मात्र, मल्ल्यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेकांच्या ट्रोलिंगचा विषय ठरली. काही युजर्सनी त्यांना “पहिल्यांदा देशाचे पैसे परत करा” अशा शब्दांत टोला लगावला. याआधी क्वालिफायर सामन्याच्या वेळीही मल्ल्यांनी शुभेच्छा दिल्या असता, त्यांना अशीच प्रतिक्रिया मिळाली होती.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…