Vidhansabha Election 2024 : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या “या” सात जणांना आमदारकी
विधानपरिषदेसाठी सात आमदारांच्या नावांना राज्यपालांनी मंजुरी दिली. स्वीकृत नावांमध्ये भाजपचे 3, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 सदस्य आहेत.
मुंबई :- विधानपरिषदेसाठी राज्यपालांकडून नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या 12 पैकी सात आमदारांच्या नावांना मंजुरी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून 12 राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांचा निर्णय प्रलंबित होता. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. आज दुपारी या आमदारांचा शपथविधी होणार आहे.
भाजपकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह विक्रांत पाटील आणि बाबू सिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना संधी मिळाली आहे. तर शिवसेनेने हेमंत पाटील आणि मनिषा कायंदे यांची वर्णी लावली आहे.
राज्यपाल नियुक्त सात आमदारांची यादी
भाजप
1.चित्रा वाघ
2.विक्रांत पाटील
3.धर्मगुरू महाराज राठोड.
शिवसेना (शिंदे गट)
1.मनीषा कायंदे
2.हेमंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
1.पंकज भुजबळ
2.इद्रिस नायकवडी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात 12 आमदारांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यांना तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली नव्हती. शिंदे-फडणवीस सरकारने आधीची 12 नावांची यादी मागे घेतली आणि आता नव्याने सात नावांची शिफारस करण्यात आली आहे. आधीच्या सरकारची नावे मागे घेण्याच्या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून याचिका प्रलंबित आहे. अडीच वर्षात न झालेल्या नियुक्त्या महिनाभरात होणार नाहीत, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली होती व नियुक्त्यांना स्थगिती दिली नव्हती. महाधिवक्त्यांनीही याबाबत न्यायालयात निवेदन केले होते.