Achole Police News : सराईत रिक्षा चोरटा ‘कुंभारपाडा’ परिसरातून जेरबंद! आचोळे पोलिसांची मोठी कारवाई

Vasai Achole Latest News : एका आरोपीकडून 1.70 लाखांच्या 4 चोरीच्या रिक्षा हस्तगत; अनेक गुन्हे उघडकीस
वसई (नालासोपारा) :- रिक्षा चोरीच्या वाढत्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या नालासोपारा परिसरात आचोळे पोलिसांनी Achole Police मोठी कारवाई करत एका सराईत रिक्षा चोरट्याला अटक केली आहे. या आरोपीकडून केवळ एका गुन्ह्यातील रिक्षाच नव्हे, तर एकूण 4 चोरीच्या रिक्षा हस्तगत करण्यात आल्या असून, 1.70 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Vasai Latest Crime News


गुन्हा आणि तपास
फिर्यादी जितेश ठाकुरदीन गॉड (रिक्षा चालक) यांची रिक्षा 11 नोव्हेंबर 2025 रोजी आचोळे गावातून चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. यानंतर आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
रिक्षा चालकच निघाला चोरटा
तपासादरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की, संशयित इसम हा विरार पूर्व, कुंभारपाडा परिसरात वास्तव्य करत आहे. पोलिसांनी सापळा रचून प्रकाश पुकराज त्रिवेदी (वय 33, व्यवसाय-रिक्षा चालक) याला जिवदानी हॉटेल परिसरातून ताब्यात घेतले.
कौशल्यपूर्ण चौकशीत त्रिवेदी याने रिक्षा चोरीची कबुली दिली. तो स्वतः रिक्षा चालक असल्याने त्याला रिक्षा चोरी करणे सोपे जात होते.
जप्त रिक्षा आणि गुन्हे
पोलिसांनी अटक आरोपी त्रिवेदी याच्याकडून एकूण चार ऑटोरिक्षा (किंमत 1.70 लाख ) हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे आचोळे पोलीस ठाण्यातील दोन आणि विरार पोलीस ठाण्यातील एका चोरीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल झाली आहे.
आरोपी प्रकाश त्रिवेदी याच्यावर यापूर्वीही विरार, वालीव, नयानगर आणि काशिमिरा पोलीस ठाण्यात चोरी, जबरी चोरी आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि पोलीस उप-आयुक्त श्रीमती पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्या मार्गदर्शनाखाली आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.


