Vidhan Parishad Oath Ceremony: पंकजा मुंडे, सदाभाऊ, मिलिंद नार्वेकर यांच्यासह महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 11 आमदारांनी घेतली शपथ
Vidhan parishad Oath Ceremony: विधान परिषदेसाठी 11 नवनिर्वाचित आमदारांनी रविवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. 11 पैकी नऊ आमदार महायुतीचे आहेत. तर दोन महा विकास आघाडीचे आहेत.
मुंबई :- विधान परिषदेच्या Vidhan Parishad निवडून आलेल्या 11 आमदारांनी रविवारी (28 जुलै) विधानभवनात शपथ घेतली. विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही उपस्थित होते. 12 जुलै रोजी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आघाडीने 11 पैकी नऊ जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्या सर्वांचा विजय झाला होता.
महायुतीत भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश आहे. महाराष्ट्रात 11 विधान परिषदेच्या जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडणूक लढले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाकडून पाठिंबा असलेले जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
1.पंकजा मुंडे-भाजप
- योगेश टिळेकर-भाजप
3.अमित गोरखे-भाजप
4.परिणय फुके-भाजप
5.सदाभाऊ खोत-भाजप
6.भावना गवळी-(शिंदे) शिवसेना
7.कृपाल तुमण-(शिंदे) शिवसेना
8.शिवाजी गर्जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)
9.राजेश व्हिटेकर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, (अजित पवार)
10.प्रज्ञा सातव-काँग्रेस,
11.मिलिंद नार्वेकर-(उद्धव ठाकरे) शिवसेना पक्ष.
महाविकास आघाडीच्या १२ उमेदवारांपैकी एका जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात लढत झाली. निकराच्या लढतीत मिलिंद नार्वेकर विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार पाटील यांचा निवडणुकीत पराभव झाला. एमएलसी निवडणुकीचा निकाल हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भाजप महायुतीचा वर्चस्व ठरला. Vidhan Parishad Latest News