Vidhan Parishad Lok Sabha Election : लोकसभेनंतर महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान होणार, तारीख जाहीर
Vidhan Parishad Lok Sabha Election : विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर झाला आहे. दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे
मुंबई :- लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) उत्सुकता संपल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 26 जून रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर झाला आहे. दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. Vidhan Parishad Lok Sabha Election News Updates
महाराष्ट्रातील विधान परिषदेची ही निवडणूक मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ, नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात होणार आहे. यापूर्वी या निवडणुकांसाठी १० जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता विधान परिषद निवडणुकीची तारीख बदलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 4 जागांवर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३१ मे ते ७ जून या कालावधीत अर्ज सादर केले जातील. 10 जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 12 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. Vidhan Parishad Lok Sabha Election News Updates
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदानाची पहिली तारीख 10 जून निश्चित करण्यात आली होती. दरम्यान, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे राज्यातील बहुतांश शाळा आणि शिक्षक 10 जून रोजी सुट्टीवर आहेत. त्यामुळे मतदानावर परिणाम होऊ शकतो, असा शिक्षक संघटनांचा दावा आहे. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य करत आता नव्याने कार्यक्रम जाहीर केला आहे.
Web Title : Vidhan Parishad Lok Sabha Election : Voting for 4 Vidhan Parishad seats in Maharashtra will be held after the Lok Sabha, date announced