मुंबई

Vidhan Parishad Election Update : विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, 10 जूनला होणार होती निवडणुक

मुंबई पदवीधर,शिक्षण, कोकण पदवीधर मतदार संघ, नाशिक शिक्षण मतदारसंघ या चार जागेसाठी होणार होते मतदान

मुंबई :- राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीतील पहिला चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. तर आणखी एका टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य विधान परिषदेच्या चार जागांसाठी देखील निवडणूक जाहीर झाली होती. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात ही निवडणूक होणार होती. यामध्ये मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचा तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचा समावेश होता. या चारही मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सध्या शाळांना सुट्टी असल्याने या निवडणुकीवर परिणाम होईल, अशी शंका अनेक शिक्षक संघटनांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने या निवडणुका आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी 10 जून रोजी मतदान होणार होते. यामध्ये चार जागांचा समावेश होता. विधान परिषदेमध्ये असलेल्या एकूण सदस्यांपैकी 7 सदस्य हे शिक्षक मतदार संघातील तर 7 सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात. यातील दोन पदवीधर मतदारसंघातील आणि दोन शिक्षक मतदार संघातील आमदारांचा कार्यकाल 7 जुलै रोजी संपत आहे.यातील दोन पदवीधर मतदारसंघातील आणि दोन शिक्षक मतदार संघातील आमदारांचा कार्यकाल 7 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होते.

खालील चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपणार होता

  1. मुंबई पदवीधर मतदारसंघ – विलास विनायक पोतनीस (ठाकरे गट)
  2. कोकण पदवीधर मतदारसंघ निरंजन वसंत डावखरे (भाजप)
  3. नाशिक शिक्षक मतदारसंघ – किशोर भिकाजी दराडे (ठाकरे गट)
  4. मुंबई शिक्षक मतदारसंघ – कपिल हरिश्चंद्र पाटील (लोकभारती)

असे जाहीर झाले होते निवडणुकीचे टप्पे

  • 15 मे – निवडणूक प्रक्रियेला सुरुवात
  • 22 मे – अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक
  • 24 मे – दाखल झालेल्या अर्जाची छाननी
  • 27 मे – अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम दिनांक
  • 10 जून – प्रत्यक्ष मतदान
  • 13 जून – मतमोजणी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0