Vidhan Parishad Election : महाविकास आघाडी कडून लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाच नावे जाहीर, उद्धव ठाकरे यांच्या राईट हॅन्ड ला विधान परिषदेचे संधी
•शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी, तर शिंदे गटाकडून भावना गवळी यांना विधान परिषदेचे संधी देण्यात आली आहे
मुंबई :- विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अंतिम मुदत आहे. तत्पूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे त्यांचे राईट हॅन्ड समजले जाणारे तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार अशा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती परंतु ते सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या सोबतच दिसत आहे. गेले 40 वर्ष पक्ष संघटनासह शिवसेनेतील अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून मिलिंद नार्वेकर यांची ओळख आहे. तसेच शिंदे गटाकडून यवतमाळच्या माजी खासदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गोळी यांचे राजकीय पुनर्वसन करत त्यांना विधान परिषदे त शिंदे गटाकडून पाठवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने कोणताही उमेदवार दिला नसून शेकापाचे जयंत पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विधान परिषदेची निवडणूक लढतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या पाठिंब्यावर अर्ज भरणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले. याशिवाय काँग्रेसकडून प्रज्ञा सातव आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर उमेदवारी अर्ज भरतील, असंही जयंत पाटील म्हणाले.
मिलिंद नार्वेकर आणि ठाकरे गटाच्या प्रतिनिधींनी मला स्वतः सांगितले की नार्वेकर उमेदवार असतील. जी काही ताकद विधानपरिषदेसाठी लागणार आहे त्या आमदारांची ताकद महाविकास आघाडीकडे आहे. मला शरद पवार यांनी शब्द दिला होता आता उर्वरित मतही मला इंडिया आघाडीची मिळतील, असंही जयंत पाटील म्हणाले. इंडिया आघाडीकडे 69-70 मतं आहेत. तीन जागा निवडून येणार आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.
विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार
भाजपचे उमेदवार :
- पंकजा मुंडे
- योगेश टिळेकर
3.डॉ. परिणय फुके - सदाभाऊ खोत
- अमित गोरखे
शिवसेना :
- भावना गवळी
- कृपाल तुमाणे
राष्ट्रवादी काँग्रेस (चर्चेतील नावं)
- राजेश विटेकर
- शिवाजीराव गरजे
काँग्रेस :
- प्रज्ञा सातव
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा
- जयंत पाटील (शेकाप)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
- मिलिंद नार्वेकर
दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभेचं सध्याचं संख्याबळ पाहता विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी एका उमेदवाराला 23 मतांचा कोटा पूर्ण करावा लागेल. तसेच 12 जुलैला मतदान होणार असून त्या संध्याकाळी मतमोजणी होऊन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.