Vidhan Parishad Election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधान परिषदेचा उमेदवार जाहीर.. कोकण पदवीधर करिता या नेत्याला मिळाली संधी
Vidhan Parishad Election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजीत पानसे कोकण पदवीधर पदाकरिता महाराष्ट्र निर्माण सेनेकडून उमेदवारी जाहीर
मुंबई :- विधान परिषदेच्या Vidhan Parishad Election चार जागे करिता निवडणुका जाहीर झाल्या आहे 26 जून रोजी मतदान होणार असून 31 मे ते 7 जून या कालावधीत अर्ज सादर करण्यात येणार आहे. यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले असून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही कोकण पदवीधर मतदार संघातून अभिजीत पानसे Abhijit Panse यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी बिनशर्त भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा दिला होता त्याकरिता त्यांनी प्रचार सभा ही घेतल्या आता विधान परिषदेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांना महायुती म्हणून इतर पक्ष साथ देणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे निरंजन डावखरे यांनी आमदार म्हणून सहा वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे यंदाही पुन्हा त्यांना संधी देण्यात येईल असे राजकीय चर्चा केली जात असताना राज ठाकरे यांनी उमेदवार जाहीर करून पुन्हा एकदा राजकीय पेज निर्माण केल्या असल्याचे दिसून येत आहे. या सर्व घडामोडीवर भाजपाकडून कोणत्याही प्रकारे उमेदवारी देण्यात आली नसून शिवसेना शिंदे गटाकडूनही अद्यापही उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे राज ठाकरे यांनी लोकसभेला ज्या अर्थी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्याप्रमाणे महायुतीचा धर्म पाळत इतर घटक पक्षही पाठिंबा देणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. Vidhan Parishad Election Latest Update
अभिजीत पानसे Abhijit Panse यांना गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपाध्यक्षपदी तसेच सिने कर्मचारी सेना यांच्या उपाध्यक्षपदी राज ठाकरे यांनी जबाबदाऱ्या दिल्या आहे यांनी अनेक वेळा मराठी चित्रपटाकरिता योग्य व्यासपीठ मिळावे आणि योग्य माणसांना मिळावे याकरिता आंदोलन केले आहे. 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांना ठाण्यातून उमेदवारी दिली होती त्यांचा पराभव झाला परंतु गेल्या अनेक वर्ष राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे अभिजीत पानसे यांचे सिनेसृष्टीत एक वेगळाच धबधबा आहे. त्यामुळे अभिजीत पानसे यांना मिळालेल्या संधीचं सोनं होणार का येणारा काळाच ठरवेल. Vidhan Parishad Election Latest Update
महाराष्ट्रातील विधान परिषदेची ही निवडणूक मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ, नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात होणार आहे. 4 जागांवर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 31 मे ते 7 जून या कालावधीत अर्ज सादर केले जातील. 10 जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 12 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. Vidhan Parishad Election Latest Update