vidhan parishad election: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपा कडून पाच उमेदवारांची यादी जाहीर, लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना पुन्हा उमेदवारी
BJP vidhan parishad election Member List : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने पंकजा मुंडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. पंकजा मुंडे बीडमधून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या.
मुंबई :- विधानपरिषद निवडणुकीसाठी vidhan parishad election भाजपने पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्या नावाचा समावेश आहे. पंकजा मुंडे यांनी बीडमधून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्या पराभूत झाल्या होत्या. भाजपाकडून विधान परिषदेच्या 11 जागांकरिता पाच नावांची यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आले आहे. तसेच भाजप ओबीसी नेते, माजी महाराष्ट्र युवा भाजपा उप अध्यक्ष योगेश टिळेकर यांनाही भाजपकडून संधी देण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे साथीदार म्हणून ओळखले जाणारे डॉ. परिणय फुके, अमित गोरखे यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.
- भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?
- पंकजा मुंडे
- योगेश टिळेकर
- परिणय फुके
- अमित गोरखे
- सदाभाऊ खोत
भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी दिल्लीत केंद्रीय नेतृत्त्वाकडे 11 नावांची यादी पाठवण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणूक आणि राजकीय समीकरणे लक्ष घेऊन भाजप पक्षश्रेष्ठींनी यापैकी पाच नावांवर शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे पंकजा मुंडे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा सभागृहात दिसणार आहेत. पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेची उमेदवारी अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे.विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. BJP vidhan parishad election Member List