Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषद निवडणुकीत मुंबई पदवीधर मतदार संघात आणि शिक्षण मतदारसंघात क्रमशः 27.01% आणि 18.31% मतदान सकाळी 11 वाजेपर्यंत झाले
• Vidhan Parishad Election 2024 कोकण पदवीधर मतदार संघात सकाळी 11 वाजेपर्यंत 20.15% मतदान झाले
मुंबई :- विधान परिषदेच्या चार जागांकरिता सध्या मतदान चालू आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत मुंबई पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघातून क्रमशा 27.01% आणि 18.31% मतदान झाले आहे. कोकण पदवीधर मतदार संघात सकाळी 11 वाजेपर्यंत 20.15% मतदान झाले आहे. मुंबई शिक्षण मतदारसंघातून पाच उमेदवारांची लढत होत आहे तर पदवीधर मतदारसंघात दोन उमेदवार रिंगणात आहे कोकण पदवीधर मतदारसंघातून प्रामुख्याने निरंजन डावखरे विरुद्ध रमेश किर असे सामना रंगला आहे. विधान परिषदेच्या चार जागेच्या निकाल एक जुलै रोजी लागणार असून विधान परिषदेच्या निवडणुकीवर कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकताचे ठरणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिक्षक उमेदवाराला शिक्षकांकडून मतदान केले जाते तर पदवीधर उमेदवाराला पदवी प्राप्त असलेल्या नागरिकाकडून मतदान केले जाते. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती उमेदवारांसाठी रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा दुसरा सामना लागला आहे तर या सामन्यात कोण बाजी मारणार याचा निकाल एक जुलै रोजी येणार आहे.
कोणत्या मतदारसंघातून कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे
मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये पाच उमेदवारांमध्ये लढत
ज. मो. अभ्यंकर : शिवसेना ठाकरे गट
शिवनाथ दराडे : भाजप
सुभाष मोरे : शिक्षक भारती
शिवाजी शेंडगे : शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार
शिवाजी नलावडे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी
अनिल परब शिवसेना ठाकरे गट
किरण शेलार : भाजप
कोकण पदवीधर मतदारसंघांत प्रामुख्यानं दोन उमेदवारांमध्ये लढत
निरंजन डावखरे : भाजप
रमेश कीर : काँग्रेस