धाराशिव

कळंब येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात

कळंब (प्रतिनिधी ): दि.३/०२/२०२६ रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री. सोपान अकेले गटविकास अधिकारी प. स.कळब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीम. सुकाळे मॅडम, विस्तार अधिकारी झांबरे , संभाजी जगदाळे, केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव, मुख्याध्यापक बी.डी .कदम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. मीना जावळे, हिना पठाण, गौरी ताटे, गोविंद तापडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. अनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, लोकगीते, रिमिक्स गाणे, यावर नृत्य सादर केले. तसेच श्री. अनिल शेळके लिखित “स्त्रीभ्रूणहत्या एक शाप “ही एक अंकी नाटिका सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.गणेश अंबाड यांनी तर सूत्रसंचालन श्री. डी .ओ .पवार यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री . बी.डी. कदम, गणेश अंबाड, श्रीम. शुभांगी नखाते, डी. ओ. पवार, अनिल शेळके,सुनीलदत्त मस्के, सविता घंटे, अर्चना घुटे, संध्या लाटे, सारिका माळी, हनुमंत झोंबाडे, अनंत तिडके, जाहिराबी शेख, यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0