•मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पांढऱ्या एसयूव्हीने समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या गणेशला चिरडले. गणेश चिरडल्याचा आवाज इतका मोठा होता की शेजारी झोपलेला बबलू जागा झाला.
मुंबई :- मुंबईतून पुन्हा एकदा हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईच्या वर्सोवा बीचवर झोपलेल्या 36 वर्षीय रिक्षाचालकाला कारने चिरडल्याची माहिती आहे. या अपघातानंतर पोलिसांनी फरार मोटारचालकासह दोन जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. दोघांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.आरोपींना अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश यादव असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. वास्तविक, गरमीमुळे गणेश आणि त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव वर्सोवा बीचवर झोपायला गेले होते. त्याचवेळी समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या गणेशला पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीने चिरडले. गणेश चिरडल्याचा आवाज इतका मोठा होता की शेजारी झोपलेला बबलू जागा झाला. हे दृश्य पाहताच बबलू घाबरला. कारमधून दोन जणांनी खाली उतरून गणेशला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही, त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले.घटनेची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी गणेशला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्हा केल्यानंतर काही तासांतच चालक आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली. या घटनेत गणेश यादवचा मित्र बबलू श्रीवास्तव थोडक्यात बचावला. त्याला सध्या मानसिक धक्का बसला आहे. समुद्रकिनाऱ्यावर वाहनांना परवानगी नसली तरी ही गाडी झोपडपट्ट्यांमधून जात समुद्रकिनारी पोहोचली आणि समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या एका व्यक्तीला चिरडले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…