मुंबई

Venkateswara Swamy : आंध्र प्रदेशात पुन्हा चेंगराचेंगरी! श्रीकाकुलम येथील मंदिरात 9 भाविकांचा मृत्यू, मुख्यमंत्री नायडूंकडून तीव्र दुःख व्यक्त

10 killed in stampede at Venkateswara Swamy Temple एकादशीच्या गर्दीत मंदिराबाहेर चेंगराचेंगरी; दक्षिण भारतात वर्षभरात अनेक ठिकाणी मोठी दुर्घटना

ANI :- दक्षिण भारताला हादरवून सोडणारी आणखी एक दुःखद घटना आंध्र प्रदेशातून समोर आली आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील व्यंकटेश्वर मंदिरात Venkateswara Swamy शनिवारी (दि. 1 नोव्हेंबर 2025 ) सकाळी भाविकांच्या चेंगराचेंगरीमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे, तसेच अनेक भाविक जखमी झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या रॅलीत आणि बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटना ताज्या असताना, आंध्र प्रदेशात पुन्हा ही दुर्घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

एकादशीच्या गर्दीमुळे दुर्घटना

व्यंकटेश्वर मंदिरात शनिवारी भाविकांची नेहमीच मोठी गर्दी असते. विशेषतः एकादशीच्या मुहूर्तावर दर्शनासाठी आलेल्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.12 एकरवर पसरलेल्या या मंदिरात दूरदूरचे भाविक दर्शनासाठी येत असतात. चेंगराचेंगरीनंतर मंदिर परिसरात अनेक भाविक जमिनीवर निपचित पडलेले दिसले, ज्यांना इतरांनी शुद्धीवर आणून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

मुख्यमंत्री नायडूंकडून मदतीचे आदेश

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत मृतांच्या कुटुंबियांना संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी जखमींना तातडीने आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच, स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदतकार्यावर देखरेख ठेवण्याची विनंती केली आहे.

वर्षभरातील तिसरी मोठी दुर्घटना

ही घटना या वर्षातील राज्यातील तिसरी मोठी जीवितहानी करणारी दुर्घटना ठरली आहे:

1.8 जानेवारी: तिरुपती येथे भगवान वेंकटेश्वर मंदिराच्या विशेष दर्शनासाठी तिकीट वितरणादरम्यान झालेल्या गर्दीत 6 जणांचा मृत्यू.

2.30 एप्रिल: विशाखापट्टणम येथील सिंहचलम मंदिरात पावसामुळे भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू.

1.नोव्हेंबर: श्रीकाकुलम येथील व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीत 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती.

यापूर्वी शेजारील तामिळनाडूमध्ये अभिनेता थलपती विजय यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 41 लोकांचा मृत्यू झाला होता.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago