Vasant More Joined Thackeray Group : वसंत मोरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी वंचितला जय भीम, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधणार
पुणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे Vasant More यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण MNS सेनेला जय महाराष्ट्र केला होता. लोकसभेच्या निवडणुकीत वंचित आघाडीने VBA वसंत मोरे यांना उमेदवारी देऊन त्यांचा पराभव झाला होता. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच पुन्हा वसंत मोरे हे वंचितला जय भीम करत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन हाती बांधणार आहे. वसंत मोरे यांनी पुण्यातील मनसेला खिंडारपाडा तब्बल 23 नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मातोश्रीच्या दिशेने निघाले आहे. Maharashtra Politics
वसंत मोरे यांनी मुंबईच्या दिशेने जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना म्हणाले की,यावेळी ते म्हणाले, “माझे हे शक्तीप्रदर्शन पहिल्यांदा नाही. माझ्या मागे जनतेची शक्ती आहे ती शक्ती सातत्याने माझ्या पाठीमागे असते. कार्यकर्त्यांची ताकद वसंत मोरेंच्या पाठीमागे आहे. गेल्या 17 वर्षांपासून पुणे शहरात वेगळे राजकारण सुरू आहे. आज जवळपास मनसेचे 17 शाखाअध्यक्ष, 5 उपविभाग अध्यक्ष, 1 शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकारी बऱ्यापैकी आज माझ्यासोबत सर्वचजण प्रवेश करत आहेत”, असे वसंत मोरे यांनी सांगितले. Maharashtra Politics
मी कोणालाही जबरदस्ती केलेली नाही तसेच ते म्हणाले, “मी यापैकी कोणालाही जबरदस्ती केलेली नाही. अगदी पहिल्या दिवसापासून मी प्रत्येकाला सांगतोय की ज्यांना पक्षात राहायचे ते राहू शकतात. परंतू पक्षात जे राजकारण सुरू होते, हे या सर्व पदाधिकाऱ्यांनी डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे कोणालाही जबरदस्ती न करता मी या सर्व पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश करत आहेत, असेही मोरेंनी स्पष्ट केले आहे. Maharashtra Politics
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…