Vasant More यांनी खासदार Sanjay Raut यांची भेट घेतली
•पुण्यात हुकूमशाहीचे वातावरण, मनसे आणि भाजपाच्या युती संदर्भात वसंत मोरे यांचे वक्तव्य
पुणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या मनसेला सोडचिट्टी देत पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. तसं त्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मनसे आणि भाजप यांच्यावरही टीका केली आहे.
वसंत मोरे काय म्हणाले?
मला लोकसभेत पुण्यात संधी मिळेल, पुण्याच्या स्थानिक नेत्यांशी मी चर्चा करेन, असे वसंत मोरे म्हणाले. तसेच पुण्यामध्ये वॉशिंग मशिन नकोच, माझंही मत तेच आहे असे मोठं विधानही त्यांनी केले आहे. वसंत मोरे यांनी आज ठाकरे गटाचे संजय राऊत यांची भेट घेतली. जवळपास अर्धातास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यानंतर ते बोलत होते.
बंद दरवाजे ठेवून भेटीगाठी घेत नाही यावेळी मोरे म्हणाले, “मी सध्या फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. पण या सगळ्या भेटीगाठी मी उघडपणे घेत आहे. बंद दरवाजे ठेवून मी कोणत्याही भेटीगाठी घेत नाही आहे. मला पुण्याची लोकसभा निवडणूक लढवायची आहे, यावर मी ठाम आहे यासाठी मी महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेत आहे. संजय राऊत, शरद पवार यांच्या भेटी मी घेतल्या ते सुद्धा सकारात्मक आहेत”, असे मोरे म्हणाले.
धंगेकरांशी फोनवर चर्चा करणार
याशिवाय “पुण्याची जागा काँग्रेसकडे जरी असली तरी त्या ठिकाणची नेत्यांशी माझा समन्वय आहे त्यांच्या मी संपर्कात आहे. आमदार रविंद्र धंगेकरांशी मी फोन केला आहे. त्यांना अजून फोन करणार देखील आहे. ते देखील माझ्या भूमिकेला साध देतील”, असा विश्वास वसंत मोरेंनी व्यक्त केला आहे. सोबतच काँग्रेसचे अरविंद शिंदे देखील इच्छूक आहेत. त्यामुळे त्यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले.
भेटीगाठी झाल्यानंतर मी निर्णय घेईल तसेच आता महाविकास आघाडीतील कुठल्या पक्षात मी जाणार यावर दोन दिवसात निर्णय घेईल. आता त्यासंदर्भात बोलणार नाही सर्वांशी चर्चा झाल्यानंतर भेटीगाठी झाल्यानंतर मी निर्णय घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.मनसेची भाजपासोबत युती होईल अशी चर्चा आहे, त्या बद्दल वसंत मोरे म्हणाले की, “मनसे या विषयावर मी बोलू इच्छित नाही. मी ज्या कारणासाठी पक्ष सोडला, त्या मुद्यावर आता मी काम करत आहे. पुण्यातील नागरिकांच्या हितासाठी मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. पुण्यात हुकूमशाही सारख वातावरण आहे, त्या विरोधात मी काम करतोय”, असे मोरे म्हणाले.
धंगेकरांशी फोनवर चर्चा करणार याशिवाय “पुण्याची जागा काँग्रेसकडे जरी असली तरी त्या ठिकाणची नेत्यांशी माझा समन्वय आहे त्यांच्या मी संपर्कात आहे. आमदार रविंद्र धंगेकरांशी मी फोन केला आहे. त्यांना अजून फोन करणार देखील आहे. ते देखील माझ्या भूमिकेला साध देतील”, असा विश्वास वसंत मोरेंनी व्यक्त केला आहे. सोबतच काँग्रेसचे अरविंद शिंदे देखील इच्छूक आहेत. त्यामुळे त्यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले.