Vasai Virar Police : मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय “एक नंबर!”

Vasai Virar Police Latest News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांचा सत्कार, सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित
मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सर्व कार्यालयांत 7 कलमी 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम राबवण्यासाठी निर्देश दिलेले होते. Vasai Virar Police Latest News त्यानुसार मिरा -भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करुन पोलीस आयुक्तालयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता.
पहिल्या नंबरचे पारितोषिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी पुरस्कार घेताना पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय व पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे उपस्थित होते. 100 दिवस कृती आराखड्याच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत प्रशासनात लोकाभिमुखता आणण्याच्या दृष्टीने 7 जानेवारी ते 16 एप्रिल या कालावधीत कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राबविण्यात आलेली होती.
कार्यक्रमांतर्गत केलेल्या कामांचे आणि राबविलेल्या उपक्रमांचे भारतीय गुणवत्ता परिषद या स्वायत्त संस्थेमार्फत गुणांकन करण्यात आलेले होते. राज्यस्तरावर केलेल्या गुणांकनात आयुक्तालय श्रेणीत मिरा-भाईदर, वसई-विरार आयुक्तालयाने एकूण 84.57 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. त्यानंतर 7 मे रोजी मंत्रालय, मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आलेले आहे.
कार्यालयीन सुधारणा मोहिमेत पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय आणि अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 प्रकाश गायकवाड, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-2, पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 जयंत बजबळे तसेच आयुक्तालयातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी चांगली कामगिरी केल्याने आयुक्तालयास राज्यातील पोलीस आयुक्तालयांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.


