•मुंबई, नाशिकमध्येही ईडीची शोधमोहीम; 69 एकरवर 41 बेकायदेशीर इमारतींचा घोटाळा उघड
वसई-विरार :- वसई-विरार परिसरात अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणात सक्तवसुली संचलालयाने (ईडी) आज पहाटेपासून धडक कारवाई करत वसई-विरार महापालिकेतील एका सर्वात मोठ्या अधिकाऱ्याच्या निवासस्थानासह मुंबई, नाशिक आणि वसई-विरार येथील एकूण 12 ठिकाणांवर छापे टाकले. बहुसंख्य छापे या अधिकाऱ्याच्या संबंधित ठिकाणांवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही कारवाई उशिरापर्यंत सुरू राहील अशी शक्यता आहे.
वसई-विरारमधील बेकायदेशीर इमारतींच्या बांधकामांप्रकरणी मुंबई ईडीने तपास सुरू केला आहे. मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयामार्फत दाखल करण्यात आलेल्या विविध गुन्ह्यांच्या आधारे ईडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यापूर्वीही ईडीने याप्रकरणी 13 ठिकाणी छापे टाकून 9 कोटींची रोकड आणि 23 कोटी रुपये किंमतीच्या हिरेजडित दागिन्यांसह सोने, चांदी आणि मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त केले होते.
ईडीच्या तपासानुसार, या प्रकरणात सुमारे 60 एकर क्षेत्रफळावर बेकायदेशीरपणे 41 निवासी आणि व्यावसायिक इमारती उभारल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्षात या भूखंडावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि कचरा डेपोचे आरक्षण होते. मात्र, आरोपी बांधकाम व्यावसायिक आणि स्थानिक दलालांनी संगनमत करून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले. त्यासाठी त्यांनी मंजुरीची बनावट कागदपत्रे तयार केली होती आणि त्याद्वारे सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांना मोठ्या प्रमाणात सदनिकांची विक्री करण्यात आली. यामुळे अनेक गरीब आणि निरपराध नागरिकांची फसवणूक झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ईडीच्या तपासानुसार, वसई-विरार परिसरात 2009 पासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ईडीने या प्रकरणांमध्ये सखोल कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत आतापर्यंत येथील 41 बेकायदा इमारती पाडण्यात आल्या आहेत. वसई-विरार महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार (उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्रमांक १५८५३/२०२२) ही कारवाई केली होती.
या तोडक कारवाईमुळे सुमारे 2500 कुटुंबे बेघर झाली आहेत. आज वसई-विरार महापालिका हद्दीतील 13 ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आचोळे पोलीस ठाण्यात दाखल एका प्रकरणाचीही ईडी तपासणी करत आहे. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी माजी नगरसेवकासह त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी 30 एकर खासगी जमीन, तसेच कचराभूमी आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी राखीव असलेली आणखी 30 एकर जमीन, अशी एकूण 60 एकर जमीन बनावट मालकी हक्काची कागदपत्रे तयार करून विविध विकासकांना विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…