Vasai Virar News : सिलेंडर वाल्याला सुट्टी पैशाच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोघांना अटक!
![](https://maharashtramirror.com/wp-content/uploads/2024/10/arrested896_2024051239006-780x470.jpg)
Vasai Virar Crime News : सुट्टे पैसे मागण्याच्या बहाण्याने सिलेंडर वाल्याच्या खिशातील 33 हजार 720 रु हातचलाखी करून लंपास केले होते.
वसई :- सुट्टे पैशाच्या बाहण्याने गॅस सिलेंडर वाल्याला लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना नायगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या दोन गुन्हे उघडकीस आणले आहे.अब्दुल नाझीर अब्दुल रशीद खान (वय 32, रा.म्हाडा कॉलनी, लोखंडवाला बंगला नं 04, अंधेरी पश्चिम मुंबई) आणि विष्णु संजयकुमार कांबळे (वय 23 रा.जोगेश्वरी पश्चिम मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नायगाव पोलीस ठाणे हद्दीत 29 जानेवारी 2025 च्या दुपारच्या सुमारास रश्मी स्टार सिटी, नायगाव पूर्व, येथील ग्राहकांचे घरी गॅसची टाकी देण्याकरीता फिर्यादी जात होते.त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती यांनी फिर्यादी जवळ येवून सुट्टे पैसे पाहीजे असल्याचे सांगुन फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवूण त्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांच्या खिशातील 32 हजार 720 रुपये देण्यास भाग पाडले व तो त्याचे साथीदारसह रिक्षात बसुन त्याठिकाणाहून पळुन गेले होते फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली आहे.
फिर्यादी यांनी अनोळखी व्यक्ती व त्याचेसोबत रिक्षात बसुन आलेला त्याचा साथीदार याचे विरुध्द फिर्यादी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात बी.एन.एस कलम 318 (4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास हा पोलीस हवालदार सतीश चव्हाण हे करीत आहेत.अब्दुल नाझीर अब्दुल रशीद खान यांच्याविरुध्द मुंबई शहर पोलीस आयुक्तालयात 05 असे यापुर्वी गुन्हे दाखल आहेत.