Vasai Virar Latest News : 70 नगरसेवकांसह बविआचे निर्विवाद बहुमत; भाजपच्या वाढत्या ताकदीला रोखण्यासाठी जुन्या फळीतील शिलेदारावर सोपवली धुरा
विरार l वसई-विरार महानगरपालिकेच्या Vasai Virar Election तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत 70 जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करणाऱ्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी माजी महापौर आणि नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण शेट्टी यांची गटनेतेपदी निवड केली आहे. महापालिकेत बविआला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, भाजपच्या संभाव्य ‘फोडाफोडी’च्या हालचाली आणि समाजमाध्यमांवरील चर्चेमुळे ठाकूरांनी अनुभवी आणि निष्ठावान नेत्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
विजयी घोडदौड आणि भाजपचे आव्हान 115 जागांच्या या निवडणुकीत बविआने 70 जागांवर विजय मिळवला, तर भाजप-शिंदे गट महायुतीने 44 जागांपर्यंत मजल मारली आहे. यामध्ये भाजपने एकट्याने 43 जागा जिंकून मुख्य विरोधी पक्ष म्हणून आपली ताकद दाखवून दिली आहे. या विजयानंतर शहरात ‘लोटस ऑपरेशन’च्या चर्चा सुरू झाल्या होत्या, ज्याला पूर्णविराम देण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी विरारमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेऊन गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली.
प्रवीण शेट्टींवर विश्वास का?
प्रवीण शेट्टी हे 1991 पासून वसई नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. हितेंद्र ठाकूर यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे शेट्टी हे पक्षातील एक अनुभवी चेहरा आहेत. वसई पश्चिमेच्या पट्ट्यात त्यांचा मोठा प्रभाव असून, या निवडणुकीत या भागातून पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. यापूर्वी त्यांनी 2019 ते 2020 या काळात महापालिकेचे महापौरपदही भूषवले आहे. दक्षिण भारतीय मतदारांमध्ये असलेली त्यांची पकड आणि प्रशासकीय कार्याचा प्रदीर्घ अनुभव यामुळेच त्यांच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ पडली आहे.
कोकण भवनात नोंदणीची तयारी बहुजन विकास आघाडीचे 70 आणि काँग्रेसचा 1 अशा एकूण 71 नगरसेवकांचा गट घेऊन लवकरच कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली जाणार आहे. भाजप आणि बविआ दोन्ही पक्ष आपले नगरसेवक फुटू नये म्हणून सध्या विशेष काळजी घेत आहेत. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या महापौरपदाच्या आरक्षणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, त्यानंतर वसई-विरारच्या नव्या महापौराची अधिकृत निवड होईल.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…