Vasai Virar Rain Update : वीज खंडित, वाहतुकीचा खोळंबा; नागरिकांचे ऑनलाइन काम ठप्प
वसई | वसई-विरार शहरात पावसाने पुन्हा मुसंडी मारली असून, रविवारी सायंकाळपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस सोमवारीही वेगाने सुरू राहिला. Vasai Virar Rain Update त्याचा परिणाम शहरातील जनजीवनावर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. अनेक भाग जलमय झाले असून, नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. Vasai Virar Latest News
सोमवारी सकाळपासूनच पावसाचा जोर टिकून असल्याने विवा कॉलेज परिसर, एम.बी. इस्टेट, नालासोपारा, वसई गाव, तिरुपती नगर, ग्लोबल सिटी ते नायगाव पर्यंत अनेक परिसरात रस्ते जलमय झाले. चाकरमान्यांना रेल्वे स्थानक गाठण्यासाठी अक्षरशः चिखल-पाण्यातून वाट काढावी लागली. वाहनचालकही या अडचणीला अपवाद नव्हते – काही वाहनं रस्त्यात बंद पडली, तर काही रस्त्यावरच अडकून पडली.
लोकल ट्रेनसेवा देखील 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी आणि अस्वस्थता जाणवली. ऑटोरिक्षांसाठी लांबच लांब रांगा लागल्या. त्यातच अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.
दिवसाची सुरुवात शाळकरी मुलांसाठीही संघर्षमय ठरली. आजपासून अनेक शाळा सुरू झाल्याने पालक आणि विद्यार्थी दोघांचीही तारांबळ उडाली. काही विद्यार्थी रेनकोट किंवा छत्रीशिवायच भिजत शाळेत पोहोचले, तर काहींनी रंगीबेरंगी रेनकोटमध्ये पावसावर मात करत शाळेचा रस्ता गाठला.
पावसामुळे शहरातील विरार येथील विवा महाविद्यालय परिसर, तिरुपती नगर, एम बी इस्टेस्ट, साईनाथ नगर, बोळींज, ग्लोबल सिटी,चंदनसार, नालासोपारा मधील अलकापुरी, गाला नगर, संकेश्वर नगर, सेंट्रल पार्क, रेल्वे स्थानक परिसर, समेळपाडा, वसईतील माणिकपूर, वसई गाव यासह विविध ठिकाणी पाणी भरले. तर नायगाव पूर्वेच्या स्टार सिटी, टीवरी रस्ता, रिलायबल, सनटेक, तलाठी कार्यालया समोर अशा विविध ठिकाणी पाणी साचले होते.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…