Vasai Virar BMC Take Action Against Illegal Work : 30 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत या क्षेत्रातील नागरिकांसाठी कलम 163 लागू, मनाई आदेश लागू
वसई :- वसई विरार महानगरपालिकेच्या Vasai Virar BMC अनेक अनधिकृत बांधकामावर सध्या प्रशासनाकडून बुलडोझर चालवले जात आहे. पण अनधिकृत बांधकामाविरुद्ध प्रशासनाकडून कठोर पावले उचलून अनधिकृत बांधकाम जमीनदस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिल्याने मागील काही दिवसांपासून मीरा-भाईंदर वसई विरार परिसरातील अनेक अनाधिकृत बांधकामांना प्रशासनाचा हातोडा पडला आहे. अशीच कारवाई करण्याकरिता मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आजोळी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील डी प्रभात क्षेत्रातील विजयलक्ष्मीनगर, वसंत नगरी, नालासोपारा पूर्व येथे अनधिकृत चाळींविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. कोणताही हस्तक्षेप होऊ नये याकरिता पोलिसांनी खबरदारी म्हणून या परिसरात 30 आणि 31 जानेवारीच्या दरम्यान मनाई आदेश म्हणजेच कलम 163 लागू करण्यात आले आहे.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2 पोर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्याकडून मनाई आदेश काढण्यात आले आहे. त्यामध्ये आचोळे येथील सर्वे नंबर 22 ते 34 व 83 विजयलक्ष्मीनगर, वसंत नगरी नालासोपारा येथील महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड व मलजल प्रक्रिया केंद्र यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहे. ही अनाधिकृत बांधकाम जमीनदस्त करण्याकरिता पोलिसांकडून कलम 163 लागू करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारे सर्व शांततेचा सुरक्षतेचा भंग होऊ नये गैरप्रकार घडून अनाधिकृत बांधकामास तोडताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये खबरदारी म्हणून पोलिसांकडून या परिसरात कलम 163 लागू करण्यात आला आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…