Vasai Virar News : वसई विरार महानगरपालिकेच्या डी प्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

Vasai Virar Municipal Corporation Take Action Against Illegale Building : महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव मोहीम,3 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत या क्षेत्रातील नागरिकांसाठी कलम 163 लागू, मनाई आदेश लागू
वसई :- वसई विरार महानगरपालिकेच्या Vasai Virar Municipal Corporation अनेक अनधिकृत बांधकामावर सध्या प्रशासनाकडून बुलडोझर चालवले जात आहे. Illegal Building पण अनधिकृत बांधकामाविरुद्ध प्रशासनाकडून कठोर पावले उचलून अनधिकृत बांधकाम जमीनदस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिल्याने मागील काही दिवसांपासून मीरा-भाईंदर वसई विरार परिसरातील अनेक अनाधिकृत बांधकामांना प्रशासनाचा हातोडा पडला आहे. अशीच कारवाई करण्याकरिता मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आजोळी पोलीस ठाण्याच्या Ajoli Police Station कार्यक्षेत्रातील डी प्रभात क्षेत्रातील विजयलक्ष्मीनगर, वसंत नगरी, नालासोपारा पूर्व येथे अनधिकृत चाळींविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. कोणताही हस्तक्षेप होऊ नये याकरिता पोलिसांनी खबरदारी म्हणून या परिसरात 3 आणि 4 फेब्रुवारीच्या दरम्यान मनाई आदेश म्हणजेच कलम 163 लागू करण्यात आले आहे.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2 पोर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्याकडून मनाई आदेश काढण्यात आले आहे. त्यामध्ये आचोळे येथील सर्वे नंबर 22 ते 34 व 83 विजयलक्ष्मीनगर, वसंत नगरी, नालासोपारा येथील महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड व मलजल प्रक्रिया केंद्र यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहे. ही अनाधिकृत बांधकाम जमीनदस्त करण्याकरिता पोलिसांकडून कलम 163 लागू करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारे सर्व शांततेचा सुरक्षतेचा भंग होऊ नये गैरप्रकार घडून अनाधिकृत बांधकामास तोडताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये खबरदारी म्हणून पोलिसांकडून या परिसरात कलम 163 लागू करण्यात आला आहे.