Vasai Virar Job Scam : आयकर विभागात वरिष्ठ पदावर नोकरीच्या आमिषाने 40 पेक्षा जास्त लोकांची कोट्यावधीची फसवणूक

Vasai Virar Income Tax Officer Scam : आयकर विभागात आयकर निरीक्षक या पदावर नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून फसवणूक करणारा तोतया आयकर अधिकाऱ्याला गुन्हे शाखेच्या बेड्या
विरार :- आयकर विभागाच्या वरिष्ठ पदावर नोकरी लावून देतो असे आमिष दाखवित शहरातील 40 पेक्षा अधिक बेरोजगार तरुण-तरुणींची तब्बल दोन कोटी होऊन अधिक रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. Income Tax Officer Vasai Virar Job Scam रिंकू शर्मा (33 वय रा. सिद्धिविनायक होम सोसायटी, तळोजा फेज-2 नवी मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. आरोपी स्वतःला आयकर आयुक्त असल्याचे लोकांना भासवत होता.आरोपीवर पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा Pelhar Police Station दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या तरुणींच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.
हा प्रकार 2021 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांनी मुलीला आयकर विभागात आयकर निरीक्षक या पदावर नोकरी लावून देतो असे तोतया आयकर आयुक्त रिंकू शर्मा यांनी सांगितले होते. त्या बदल्यात रिंकू शर्मा यांना फिर्यादी यांच्याकडून 15 लाख रुपये दिले होते. त्यानंतर रिंकू शर्मा यांनी मुलीला आयकर विभागाचे आयकर निरीक्षक बनावट ओळखपत्र आणि नियुक्त पत्र दिले होते. याप्रकरणी फसवणूक झालेल्या मुलीच्या वडिलांनी पेल्हार पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बी एन एस कलम 318(4),204,319(2),338,336(3),340(2),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन पोलीस उप आयुक्त गुन्हे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सुचना गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष-3 विरार व्दारे सुरु करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपणीय बातमीवरुन आरोपी रिंकु जितु शर्मा याला नवी मुंबई, (7 जानेवारी) रोजी ताब्यात घेण्यात आले आहे . पोलिसांनी आरोपीच्या कब्जात एकूण 28 विविध बनावट ओळखपत्रे मिळून आली. त्यात आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त, ,आयकर निरीक्षक, गृह विभागाचे सहाय्यक आयुक्त व सि.बी.आय. विभागाचे पोलीस आयुक्त या ओळखपत्रांचा सामावेश आहे.आयकर विभागात सहाय्यक आयुक्त, आयकर निरीक्षक या पदावर नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवून 40 पेक्षा जास्त बेरोजगार तरुण व तरुणी यांची सुमारे 2 कोटी पेक्षा जास्त रकमेची फसवणूक आरोपीने केली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. आरोपीला पेल्हार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मीरा-भाईंदर वसई विरार. पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुमित जाधव, युवराज वाघमोडे, सुनिल पाटील, मनोहर तारडे, तुषार दळवी, अतिष पवार, सागर सोनवणे प्रवीण वानखेडे, गणेश यादव, सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष-3 विरार तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सायबर सेल यांनी पार पाडली आहे.